शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : ग्रामीण रस्ते विकास कंत्राटी कर्मचारी संघटनेचे लेखणी बंद आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 16:13 IST

प्रधानमंत्री, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेमधील कंत्राटी तत्त्वावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची २०१२ पासून रोखलेली वेतनवाढ तसेच अन्य प्रलंबित मागण्यांसाठी वारंवार पाठपुरावा करूनसुद्धा शासनदरबारी कोणतीही दखल घेतली जात नसल्याने ग्रामीण रस्तेविकास कंत्राटी संघटनेच्या वतीने गुरुवारी राज्यस्तरीय लेखणी बंद आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्देग्रामीण रस्तेविकास कंत्राटी संघटनेच्या वतीने लेखणी बंद राज्यस्तरीय आंदोलन; ७३४ कर्मचाऱ्यांचा समावेश

कोल्हापूर : प्रधानमंत्री, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेमधील कंत्राटी तत्त्वावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची २०१२ पासून रोखलेली वेतनवाढ तसेच अन्य प्रलंबित मागण्यांसाठी वारंवार पाठपुरावा करूनसुद्धा शासनदरबारी कोणतीही दखल घेतली जात नसल्याने ग्रामीण रस्तेविकास कंत्राटी संघटनेच्या वतीने गुरुवारी राज्यस्तरीय लेखणी बंद आंदोलन करण्यात आले.महाराष्ट्रातील ग्रामीण व जलसंधारण विभाग महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विभाग संस्था, प्रधानमंत्री, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अल्प मानधनावर काम करीत आहे.पगारवाढीसह, विमा संरक्षण, मातृत्व रजा, प्रवासी भत्ता वाढ या प्रलंबित मागण्यांसाठी २०१६ साली काम बंद आंदोलन केले होते. यावेळी प्रलंबित मागण्या सोडविण्यात येतील, असे आश्वासन शासनाने दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. मात्र एक वर्ष होऊन वारंवार पाठपुरावा करूनसुद्धा शासनदरबारी कोणतीही दखल घेत नसल्याने राज्यस्तरीय लेखणी बंद आंदोलन केले आहे.गुरुवारी सकाळी सर्व कर्मचाऱ्यांनी कार्यालयांत राज्यस्तरीय आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी लेखणी बंद आंदोलन केले. आंदोलनात कनिष्ठ अभियंता रोहन बराले, गणेश गायकवाड, विनायक डवरी, अमोल सुतार, वरिष्ठ लिपिक शीतल साळोखे, स्थापत्य अभियंता सहायक शीतल तोरस्कर, पल्लवी नद्रे, महेश धुमाळ, रवींद्र कोळी, शैलेश जाधव, स्वप्निल बकरे, विशाल पोतदार यांचा सहभाग होता.

 

आंदोलनात राज्यातील ७३४ कर्मचारी सहभागी झाले आहेत. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील १३ कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे. वाढत्या महागाईमुळे दैनंदिनी खर्च, मिळणारे शासनाचे मानधन हे अत्यल्प असल्याने या कर्मचाऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. वारंवार पाठपुरावा करूनही कोणीही दखल घेत नसल्याने आम्ही राज्यस्तरीय आंदोलनात सहभागी झालो आहोत.- गणेश गायकवाड,जिल्हा समन्वयक

 

 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरChakka jamचक्काजाम