शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : करवीर नगर वाचन मंदिरजवळ रस्ता रोको, १५ दिवसात नो फेरिवाला झोन करण्याचे आश्वासन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 19:29 IST

वाढते अतिक्रमण, अतिक्रमण केलेल्या विक्रेत्यांच्या रोजच्या भांडणाला, अरेरावीला कंटाळून भवानी मंडप परिसरातील करवीर नगर वाचन मंदिरजवळ शुक्रवारी तब्बल तासभर नागरिकांनी रास्ता रोको केला. पुढील १५ दिवसांत हा रस्ता ‘नो फेरिवाला झोन करु’असे आश्वासन महापालिकेचे उपशहर अभियंता एस.के.माने यांनी यावेळी नागरिकांना दिले.

ठळक मुद्दे करवीर नगर वाचन मंदिरजवळ रस्ता रोको१५ दिवसात नो फेरिवाला झोन करण्याचे आश्वासन वाढते अतिक्रमण, फेरिवाल्यांची अरेरावी आदींसाठी नागरिक रस्त्यावर

कोल्हापूर : वाढते अतिक्रमण, अतिक्रमण केलेल्या विक्रेत्यांच्या रोजच्या भांडणाला, अरेरावीला कंटाळून भवानी मंडप परिसरातील करवीर नगर वाचन मंदिरजवळ शुक्रवारी तब्बल तासभर नागरिकांनी रास्ता रोको केला. पुढील १५ दिवसांत हा रस्ता ‘नो फेरिवाला झोन करु’असे आश्वासन महापालिकेचे उपशहर अभियंता एस.के.माने यांनी यावेळी नागरिकांना दिले.करवीर नगर वाचन मंदिर ते बिंदू चौक कारागृह या रस्त्यावर अतिक्रमण वाढले आहे. त्यामुळे दिवसेंदिवस वाहतूकीची कोंडी होत आहे. कचऱ्यांचा प्रश्न , किरकोळ अपघाताचे प्रमाण वाढले आहे. तसेच अंबाबाई देवी मंदिरात दर्शनासाठी येणारे पर्यटक, भाविक यांचे पाठमोरे छायाचित्र आणि त्यांचे चित्रीकरण अशा गंभीर बाबी होत आहे. यासाठी शुक्रवारी या परिसरातील नागरिकांनी रस्ता रोको केला.

हा प्रकार समजताच उपशहर अभियंता एस.के.माने, जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक अनिल गुजर, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ घटनास्थळी आले. त्यांनी नागरिकांना रस्ता रोको करु नका, अशी विनंती केली. माने यांनी, हा रस्ता १५ दिवसांत नो फेरिवाला झोन करतो, असे आश्वासन दिले. त्यानंतर रस्ता रोको मागे घेण्यात आला. पण, १५ दिवसांत नो फेरिवाला झोन झाला नाहीतर पुन्हा रस्त्यावर उतरु, असा इशारा नागरिकांनी यावेळी दिला.यापुर्वी याप्रश्नी महापालिकेचे आयुक्त यांना निवेदन दिले होते. पण, प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले होते. त्यामुळे आजचा हा रस्ता रोको करण्यात आला असल्याचे नागरिकांनी यावेळी सांगितले. दरम्यान, २००३ ला भवानी मंडप कमान येथे अतिक्रमणाविरोधात नागरिकांनी आक्रमक भुमिका घेतली होती. त्यानंतर येथील फेरिवाल्यांना महापालिका प्रशासनाने येथून हलवले होते, असे नागरिकांनी सांगितले.रास्ता रोकोमध्ये शिवराज नाईक, वसंत वाठारकर, अमर झाड, सतीश अतिग्रे, किशोर ओतारी, संजय करजगार, विजय करजगार, तानाजी पाटील, बंडा साळुंखे, अवधूत भाट्ये, दीपक इंगळे, प्रकाश जवळकर, युवराज सावंत, अमित शहा, सुरेश काकडे आदींचा सहभाग होता. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMuncipal Corporationनगर पालिका