शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींना सुनावले खडेबोल  
2
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
3
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
4
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
5
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
6
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
7
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
8
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
9
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
10
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
11
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
12
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
13
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
14
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
15
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
16
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
17
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
18
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
19
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
20
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video

कोल्हापूर : राजेंद्र नगरमधील सराईत महिला चोरट्यांना अटक, पावणेदोन लाख किमतीचा ऐवज जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2018 11:27 IST

मिरजकर तिकटी येथील एका इमारतीच्या तळमजल्यावरील कार्यालयाच्या दरवाजाचे कुलूप तोडून सोन्या-चांदीचे दागिने व रोकड लंपास करणाऱ्या राजेंद्रनगर झोपडपट्टीतील सराईत दोन महिला चोरट्यांना पोलिसांनी अटक केली.

ठळक मुद्देराजेंद्र नगरमधील सराईत महिला चोरट्यांना अटकपावणेदोन लाख किमतीचा ऐवज जप्त

कोल्हापूर : मिरजकर तिकटी येथील एका इमारतीच्या तळमजल्यावरील कार्यालयाच्या दरवाजाचे कुलूप तोडून सोन्या-चांदीचे दागिने व रोकड लंपास करणाऱ्या राजेंद्रनगर झोपडपट्टीतील सराईत दोन महिला चोरट्यांना पोलिसांनी  अटक केली. संशयित अश्विनी दत्ता नाईक (वय २६), बायडी सागर रसाळ (३०) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्या ताब्यातून १ लाख ६८ हजार किमतीचा ऐवज जप्त केला.

अश्विनी नाईक (आरोपी)अधिक माहिती अशी, शहर पोलीस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांना खबऱ्याकडून माहिती मिळाली की, शहरामध्ये चोऱ्या करणाऱ्या अश्विनी नाईक व बायडी रसाळ या दोघींनी आठ दिवसांपूर्वी मिरजकर तिकटी येथे घरफोडी केली आहे. चोरीतील सोन्या-चांदीचे दागिने त्यांच्या घरी आहेत. त्यानुसार डॉ. अमृतकर यांनी पथकातील पोलीस उपनिरीक्षक किशोर डोंगरे, कॉन्स्टेबल अमर आडुळकर, समीर मुल्ला, दीपाली इंगवले, स्वप्नाली खोत यांना कारवाईचे आदेश दिले.

बायडी रसाळ (आरोपी)

या पथकाने सोमवारी दुपारी राजेंद्रनगर झोपडपट्टी येथील अश्विनी नाईक हिच्या घरी छापा टाकून झडती घेतली. तिच्याकडे विचारपूस करताना तिने सुरुवातीस उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर मात्र साथीदार बायडी रसाळ हिच्या मदतीने चोरीची कबुली दिली. या दोघींनी घरात लपवलेले चोरीचे दागिने हस्तगत केले. सध्या त्या पोलीस कोठडीत असून त्यांच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

 

टॅग्स :Crimeगुन्हाkolhapurकोल्हापूर