शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

कोल्हापूर :रसिकांच्या उदंड प्रतिसादात ‘राज्य बालनाट्य’चा समारोप,  निकाल २२ तारखेला अपेक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2018 19:20 IST

बालकांचे भावविश्व अभिनयाद्वारे रसिकांपर्यंत पोहोचविणाऱ्या बालचमूंच्या सादरीकरणाला सलाम करीत गुरुवारी राज्य बालनाट्य स्पर्धेचा समारोप झाला. पुण्यातील स्पर्धा संपल्यानंतर साधारण २२ तारखेपर्यंत या स्पर्धांचा निकाल जाहीर होण्याची अपेक्षा आहे.

ठळक मुद्देरसिकांच्या उदंड प्रतिसादात ‘राज्य बालनाट्य’चा समारोप२२ तारखेपर्यंत निकाल जाहीर होण्याची शक्यता

कोल्हापूर : वृद्धाश्रमात वयोवृद्धांची होणारी घुसमट, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, बालमजुरी, पालकांचे छत्र हरपलेल्या बालकांचे भावविश्व अशा अवघड प्रश्नांचे स्वत:च्या बुद्धीने आकलन करून ते अभिनयाद्वारे रसिकांपर्यंत पोहोचविणाऱ्या बालचमूंच्या सादरीकरणाला सलाम करीत गुरुवारी राज्य बालनाट्य स्पर्धेचा समारोप झाला. पुण्यातील स्पर्धा संपल्यानंतर साधारण २२ तारखेपर्यंत या स्पर्धांचा निकाल जाहीर होण्याची अपेक्षा आहे.केशवराव भोसले नाट्यगृहात गेल्या सात दिवसांपासून रंगलेल्या १५ व्या राज्य बालनाट्य स्पर्धेचा समारोप रात्री आठ वाजता महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर समिती, सांगली या संस्थेने सादर केलेल्या ब्लू व्हेल आणि व्हाईट रोझेस या नाटकाने झाला.यात वृद्धाश्रमात राहणाऱ्या वृद्धांच्या वेदना, अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण या मूलभूत गोष्टींच्या अभावात जगणारी झोपडपट्टीतील मुले, बंद गलीतून अन्नासाठी धडपडणाऱ्या बालमजुरांची उत्तररात्रीची कहाणी, योग्य संगोपन न झालेल्या बालकांच्या आयुष्याला लागलेले वळण, रिअ‍ॅलिटी शोचे आकर्षण आणि त्यात होरपळणारे बालपण, विज्ञानाशी मैत्री, शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि त्यावर बालमनाने शोधलेले उपाय, ब्लू व्हेल गेम अशा विविध विषयांवर भाष्य करण्यात आले.स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी चिंगी (आम्ही कलाकार सांस्कृतिक प्रतिष्ठान, इचलकरंजी), अशी एक परिकथा (अण्णा भाऊ इंग्लिश स्कूल, आजरा), बंद गली (अखिल भारतीय नाट्य परिषद, मिरज), चम चम चमको (आजरा हायस्कूल, आजरा), न्याय हवा, न्याय (आदर्श गुरुकुल विद्यालय, पेठवडगाव), बिल्कूची गोष्ट (बाबा वर्दम थिएटर्स, कुडाळ), हिरवी बाभळ (आरती प्रभू कला अकादमी, कुडाळ), देवबाभळी (देवल स्मारक मंदिर, सांगली) ही नाटके सादर झाली.कोल्हापूर केंद्रानंतर आता पुणे केंद्रात प्राथमिक फेरी होणार आहे. ही स्पर्धा १९ तारखेला संपल्यानंतर २२ तारखेपर्यंत निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. प्रशांत जोशी व मिलिंद अष्टेकर यांनी स्पर्धेचे संयोजन केले.

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरentertainmentकरमणूक