शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
5
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
6
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
7
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
8
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
9
आयोग नव्हे, मतदारच राजा !
10
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
11
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
12
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
13
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
14
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
15
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
16
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
17
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
18
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
19
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
20
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!

कोल्हापूर : बारावीच्या परीक्षेला प्रारंभ; केंद्रांवर बाहेर पालकांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2018 19:01 IST

‘पेपर शांतपणे सोडव’, ‘गडबड करू नको’, ‘गोंधळून जाऊ नको’ अशा सूचना स्वीकारीत बारावीच्या विद्यार्थ्यांनी बुधवारी इंग्रजीचा पहिला पेपर दिला. या पेपरने बारावीच्या परीक्षेचा प्रारंभ झाला. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे ही परीक्षा घेण्यात येत आहे.

ठळक मुद्देबारावीच्या परीक्षेला प्रारंभकेंद्रांवर बाहेर पालकांची गर्दी

कोल्हापूर : ‘पेपर शांतपणे सोडव’, ‘गडबड करू नको’, ‘गोंधळून जाऊ नको’ अशा सूचना स्वीकारीत बारावीच्या विद्यार्थ्यांनी बुधवारी इंग्रजीचा पहिला पेपर दिला. या पेपरने बारावीच्या परीक्षेचा प्रारंभ झाला. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे ही परीक्षा घेण्यात येत आहे. कोल्हापूर विभागातून या वर्षी कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांतून एकूण १ लाख २९ हजार परीक्षार्थ्यांनी यंदा परीक्षेसाठी नोंदणी केली आहे.कोल्हापूर विभागातील कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांतील एकूण १५४ केंद्रांवर परीक्षा होत आहे. शहरातील विवेकानंद कॉलेज, महावीर महाविद्यालय, शहाजी कॉलेज, कॉमर्स कॉलेज, न्यू कॉलेज, गोखले कॉलेज, कमला महाविद्यालय, आदी परीक्षा केंद्रे सकाळी दहा वाजल्यापासून परीक्षार्थ्यांच्या गर्दीने फुलून गेली.

विद्यार्थी-विद्यार्थिनींनी आई-वडील, आजी-आजोबांसह अन्य नातेवाईक यांचे आशीर्वाद घेऊन, तर काहींनी सकाळी विविध मंदिरांत जाऊन दर्शन घेतले. आपल्या पाल्यांना परीक्षा केंद्रावर सोडण्यासाठी काही पालकांनी सुटी घेतली होती; तर काहीजण अर्धी रजा घेतली होती. केंद्राबाहेरील परिसरात विद्यार्थी-विद्यार्थिनी नोट्स, पुस्तकांवर अखेरची नजर टाकली.

काहीजणांनी चर्चेतून उजळणी केली. परीक्षा केंद्रावर परीक्षार्थ्यांना ओळखपत्र पाहूनच प्रवेश देण्यात आला. त्यांना पेपरप्रारंभाच्या अर्धा तास आधी केंद्रात सोडण्यात आले. परीक्षार्थ्यांना पेपर नीट वाचता यावा, ते गोंधळून जाऊ नयेत यासाठी दहा मिनिटे आधी पेपर देण्यात आला. प्रत्येक केंद्रावर पोलीस बंदोबस्त होता.

महाविद्यालयांनी प्रथमोपचार आणि वैद्यकीय सुविधेची व्यवस्था केली आहे. परीक्षेतील पहिलाच पेपर इंग्रजीचा असल्याने शिक्षण मंडळाच्या कोल्हापूर विभागाची भरारी पथकांनी विविध केंद्रांना भेटी दिल्या. परीक्षार्थी, पर्यवेक्षक आणि केंद्रसंचालकांना केंद्रावर मोबाईल घेऊन जाण्यास बंदी होती. पालक, नातेवाईक आणि मित्र-मैत्रिणी पेपर सुटेपर्यंत आपल्या पाल्यासाठी परीक्षा केंद्राबाहेर थांबून होते.

काहीसा तणावपहिला पेपर इंग्रजीचा असल्याने विद्यार्थी काहीसे तणावात होते. पेपर सुटल्यानंतर ‘पेपर सोपा होता’, ‘पेपर चांगला लिहिला’, ‘हुश्श... झाला इंग्रजीचा पेपर’ अशा प्रतिक्रिया परीक्षार्थ्यांनी व्यक्त केल्या. पेपर झाल्यानंतर केंद्राच्या आवारात एकमेकांशी पेपरबाबत परीक्षार्थ्यांमध्ये चर्चा सुरू होत्या. बहुतांश परीक्षार्थ्यांनी दुसऱ्या पेपरची तयारी करण्यासाठी लवकर घरी जाण्यास प्राधान्य दिले.

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरexamपरीक्षा