शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
Lufthansa Flight : 'Lufthansa'च्या विमानाला हैदराबादमध्ये उतरण्याची परवानगी नाकारली, जर्मनीला परतलं; नेमकं प्रकरण काय?
3
Mumbai: गिरगावमध्ये रस्त्याला भगदाड, बेस्ट बस पाच फूट खोल खड्यात, व्हिडीओ बघा
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्षभरात कमावले ₹५,१०० कोटी, कुठून आला त्यांच्याकडे इतका पैसा?
5
माकडाच्या हाती लागलं नोटांचं बंडल, झाडावर चढून केली ५००-५०० रुपयांच्या नोटांची उधळण, व्हिडीओ व्हायरल
6
इराण-इस्रायल संघर्षामुळे पाकिस्तानवर रडण्याची वेळ! पेट्रोल-डिझेलचे भाव भडकले, काय आहेत दर?
7
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
8
Ritual: अकाली मृत्यू येऊ नये म्हणून रोज झोपण्यापूर्वी करा 'ही' दोन ओळींची प्रार्थना!
9
आमदार, खासदार विकत घ्यायला पैसे आहेत पूल बांधायला नाही? मावळ दुर्घटनेवरुन राऊतांचा सवाल
10
Post Office च्या 'या' स्कीममध्ये हवी तितकी खाती उघडू शकता, हमी परताव्यासह मिळेल Tax मध्येही सूट
11
इंग्लंडविरूद्धच्या टेस्टसाठी शार्दुल ठाकूरला 'प्लेइंग ११'मध्ये संधीची शक्यता, 'या' खेळाडूला डच्चू?
12
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
13
Israel-Iran War : भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
14
"आई कुठे काय करते मला सोडायची नव्हती पण...", संजनाची भूमिका साकारलेल्या दिपाली पानसरेने सांगितलं नेमकं कारण
15
"मंत्रालयातून उडी मारावी लागेल अशी वेळ.."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याची बिकट अवस्था, म्हणाला- "वय झाल्यामुळे.."
16
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
17
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
18
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
19
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
20
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?

कोल्हापूर : सोळा हजार माध्यमिक शिक्षक उद्यापासून संपावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2018 14:01 IST

राज्य सरकारी, निमसरकारी कर्मचारी संघटना समन्वय समितीच्या वतीने उद्या, मंगळवारपासून पुकारलेल्या संपात जिल्ह्यातील सरकारी अनुदान घेणाऱ्या सर्व प्रकारच्या माध्यमिक शाळांनी पाठिंबा दिला आहे.

ठळक मुद्देसोळा हजार माध्यमिक शिक्षक उद्यापासून संपावरदादासाहेब लाड याची माहिती : सरकारी कर्मचारी संघटनांच्या संपाला पाठिंबा

कोल्हापूर : राज्य सरकारी, निमसरकारी कर्मचारी संघटना समन्वय समितीच्या वतीने उद्या, मंगळवारपासून पुकारलेल्या संपात जिल्ह्यातील सरकारी अनुदान घेणाऱ्या सर्व प्रकारच्या माध्यमिक शाळांनी पाठिंबा दिला आहे. जिल्ह्यातील ८३० माध्यमिक शाळांतील सुमारे सोळा हजार शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी संपात सहभागी होणार असल्याची माहिती शिक्षक नेते दादासाहेब लाड यांनी दिली.दादासाहेब लाड म्हणाले, केवळ सातव्या वेतन आयोगासाठी आमचे आंदोलन नाही. त्याशिवाय अनेक प्रश्नांनी माध्यमिक शिक्षण क्षेत्राला ग्रासले आहे. त्यांच्या सोडवणुकीसाठी संपात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत प्रत्येक शाळेत जागृती करणार आहे.मुख्याध्यापक संघाचे सचिव दत्ता पाटील म्हणाले, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना निवडणुकीच्या संदर्भातील बी. एल. ओ. किंवा तत्सम कामे लावू नयेत, २० टक्के अनुदानावरील शाळांना १०० टक्के अनुदान तत्काळ द्यावे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती करण्यास पूर्वीप्रमाणे परवानगी द्यावी, १२ टक्के वेतनेतर अनुदान शाळांना मिळावे, अंशदायी पेन्शन योजना रद्द करून जुनी योजना लागू करावी, कला व क्रीडाशिक्षकांची भरती सुरू करावी, अशा विविध मागण्यांसाठी शिक्षक रस्त्यांवर उतरणार आहेत.विलास साठे म्हणाले, १९७८ ला अशा प्रकारचा संप झाला होता. सरकार संप फोडायचा प्रयत्न करीत आहे; पण आता नाही तर कधीच मिळणार नसल्याने शिक्षकांनी ताकदीने या संपात सहभागी व्हावे. बाबा पाटील, बी. एस. खामकर, सुरेश खोत, पंडित पोवार, बी. डी. पाटील, राजेंद्र रानमाळे, बी. डी. पाटील, आदी उपस्थित होते.

टाऊन हॉल येथून फेरीकोल्हापूर शहर व करवीर तालुक्यातील शिक्षक टाऊन हॉल येथून शिवाजी चौकमार्गे बिंदू चौकापर्यंत फेरी काढणार आहेत. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार असून प्रत्येक तालुक्यात अशा प्रकारे तहसीलदारांना निवेदन दिले जाईल, असे राजेश वरक यांनी सांगितले.

 

टॅग्स :Teachers Recruitmentशिक्षकभरतीkolhapurकोल्हापूर