शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : बालकल्याण समितीच्या शुभांगी जोशी अध्यक्षा, नव्या नियुक्त्या : बालन्याय मंडळावर चोरगे, देशपांडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 12:19 IST

काळजी व संरक्षणाची गरज असणाऱ्या बालकांसंदर्भात अंतिम निर्णय घेणारे न्यायालयीन खंडपीठ असलेल्या बालकल्याण समितीच्या अध्यक्षपदी शासनाने इचलकरंजीच्या शुभांगी दामोदर जोशी यांची नियुक्ती केली. यापूर्वी प्रियदर्शिनी चोरगे या समितीच्या अध्यक्षा होत्या. नव्या नियुक्त्या तीन वर्षांसाठी आहेत. श्रीमती जोशी या गेली पंधरा वर्षे समाजकार्यात आहेत. शासनाच्या समितीवरही त्यांनी यापूर्वी काम केले आहे.

ठळक मुद्देबालकल्याण समितीच्या शुभांगी जोशी अध्यक्षानव्या नियुक्त्या : बालन्याय मंडळावर चोरगे, देशपांडे

कोल्हापूर : काळजी व संरक्षणाची गरज असणाऱ्या बालकांसंदर्भात अंतिम निर्णय घेणारे न्यायालयीन खंडपीठ असलेल्या बालकल्याण समितीच्या अध्यक्षपदी शासनाने इचलकरंजीच्या शुभांगी दामोदर जोशी यांची नियुक्ती केली. यापूर्वी प्रियदर्शिनी चोरगे या समितीच्या अध्यक्षा होत्या. नव्या नियुक्त्या तीन वर्षांसाठी आहेत. जोशी या गेली पंधरा वर्षे समाजकार्यात आहेत. शासनाच्या समितीवरही त्यांनी यापूर्वी काम केले आहे.या समितीच्या सदस्यपदी प्रा.जे. के. पवार, बालकल्याण संकुलातील माजी कर्मचारी कांचन सुभाष अंगडी व व्ही. बी. शेटे आणि कोरोचीचे अ‍ॅड. दिलशाही इलाही मुजावर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मावळत्या समितीत आभास फौंडेशनचे अतुल देसाई, दीपक भोसले, डॉ. शुभदा दिवाण व संजय देशपांडे यांचा समावेश होता.

या समितीच्या सदस्यांना प्रत्येक बैठकीला दीड हजार रुपये मानधन दिले जाते. महिन्याला समितीच्या सरासरी २० बैठका होतात. बालकल्याण समितीचे कामकाज बालकल्याण संकुलातून चालते व बाल न्याय मंडळाचे कामकाज सीपीआर समोरील जुन्या जिल्हा न्यायालयाच्या इमारतीतून चालते. दोन्ही समित्यांना प्रत्येक बैठकीत न्यायालयीन सहा तास काम करणे बंधनकारक आहे.बालकल्याण समितीबरोबरच शासनाने बालन्याय मंडळावरील सदस्यांचीही नव्याने नियुक्ती केली आहे. बालन्याय मंडळाच्या अध्यक्षपदी जिल्हा न्यायाधीशांनी नियुक्त केलेले प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी काम पाहतात. दोन सामाजिक कार्यकर्ते सदस्य असतात. त्यामध्ये प्रियदर्शिनी चोरगे व संजय देशपांडे यांची वर्णी लागली आहे. यापूर्वी राजश्री साकळे व व्ही. बी. शेटे हे सदस्य म्हणून काम पाहत होते.शासनाने या दोन्ही समित्यांच्या राज्यातील सर्व जिल्ह्यांतील सदस्यांच्या नियुक्तीचे राजपत्र दि. ७ एप्रिलला प्रसिद्ध केले आहे. बालन्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम, २०१५ (२०१६ चा २)मधील कलम २७ च्या पोटकलम (१) अन्वये प्रदान करण्यात आलेले अधिकार व त्याअनुषंगाने देण्यात आलेले इतर अधिकार यांचा वापर करून ही समिती स्थापन करण्यात येते. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरwomen and child developmentमहिला आणि बालविकास