शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : प्रजासत्ताक दिनी राजपथावर अवतरणार शिवराज्याभिषेक सोहळा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2018 16:48 IST

शिवरायांचे वंशज खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या प्रयत्नाने राजधानी दिल्लीमध्ये प्रजासत्ताक दिनी राजपथावर होणाऱ्या संचलनामध्ये शिवराज्याभिषेक सोहळ्याची प्रतिकृती चित्ररथाच्या माध्यमातून जगासमोर मांडण्यात येणार आहे.

ठळक मुद्देखासदार संभाजीराजेंच्या प्रयत्नांना यश शिवरायांचा स्फूर्तीदायक इतिहास चित्ररथाच्या माध्यमातून जगसमोर येणार

कोल्हापूर : किल्ले रायगडावर ६ जून १६७४ रोजी शिवछत्रपती महाराजांना झालेला राज्याभिषेक तरुणांना स्फूर्तीदायक आहे. या शिवराज्याभिषेकाचे महत्त्व संपूर्ण देशाला समजावे, तसेच भावी तरुण पिढीला स्फूर्ती मिळावी, त्यांच्यामध्ये राष्ट्रप्रेमाची भावना जागृत व्हावी या उद्देशाने शिवरायांचे वंशज खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या प्रयत्नाने राजधानी दिल्लीमध्ये प्रजासत्ताक दिनी राजपथावर होणाऱ्या संचलनामध्ये शिवराज्याभिषेक सोहळ्याची प्रतिकृती चित्ररथाच्या माध्यमातून जगासमोर मांडण्यात येणार आहे.किल्ले रायगडावर शिवछत्रपती महाराजांचा ६ जून १६७४ रोजी राज्याभिषेक संपन्न झाला. मराठ्यांच्या स्वतंत्र व सार्वभौम राज्याची स्थापना झाली. या शिवराज्याभिषेकाचे महत्त्व संपूर्ण देशाला समजावे, तसेच भावी तरुण पिढीला स्फूर्ती मिळावी, त्यांच्यामध्ये राष्ट्रप्रेमाची भावना जागृत व्हावी या उद्देशाने शिवरायांचे वंशज संभाजीराजे छत्रपती यांच्या प्रयत्नाने राजधानी दिल्लीमध्ये प्रजासत्ताक दिनी राजपथावर हा सोहळा अनुभवता येणार आहे. राजपथावर होणाऱ्या संचलनामध्ये या शिवराज्याभिषेक सोहळ्याची प्रतिकृती असणाऱ्या चित्ररथाच्या माध्यमातून हा इतिहास जगासमोर मांडण्यात येणार आहे.मुघल सत्तेला मूळातून हादरा देणारी शिवराज्याभिषेकाची घटना अखंड भारतवर्षाचा भाग्योदय करणारी आहे. खासदार संभाजीराजे यांच्या पुढाकाराने किल्ले रायगडावर प्रतिवर्षी ६ जूनला शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो. या सोहळ्याची व्याप्ती दिवसेंदिवस वाढतच असून लाखो शिवभक्त गडावर शिवरायांना अभिवादन करण्यासाठी उपस्थित असतात.देशाची राजधानी असणाऱ्या दिल्लीमध्येही शिवरायांचा तेजस्वी इतिहास सांगणारा एखादा कार्यक्रम घेण्याचे संभाजीराजेंचे प्रयोजन आहे. प्रजासत्ताक दिनी वेगवेगळ्या राज्यांच्या संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या चित्ररथांचे राजपथावर संचलन होत असते. यावेळी राष्ट्रपती, पंतप्रधान तसेच वेगवेगळ्या देशांचे प्रतिनिधी राजपथावर उपस्थित असतात.या मान्यवरांच्या आणि विविध देशांच्या प्रतिनिधींसमोर चित्ररथाच्या माध्यमातून शिवराज्याभिषेक सोहळा साऱ्या जगासमोर मांडण्याचा निश्चय संभाजीराजे यांनी केला होता. गेल्या काही महिन्यांपासून संभाजीराजे यासाठी पाठपुरावा करीत होते. एक महिन्यापूर्वीच संभाजीराजेंच्या दिल्ली येथील निवासस्थानी या चित्ररथासाठी तयार करण्यात आलेल्या प्रतिकृतीची पाहणी करण्यात आली होती. त्यावेळी राजेंनी त्यामध्ये काही आवश्यक बदलही सुचविले होते.

येत्या प्रजासत्ताक दिनी दिल्ली येथे राजपथावर होणाऱ्या विविध राज्यांच्या चित्ररथांच्या संचलनात महाराष्ट्राच्या दिमाखदार चित्ररथावर शिवराज्याभिषेक सोहळा संपूर्ण देशालाच नव्हे तर जगाला पहायला मिळेल. हा सर्व शिवभक्तांसाठी अभिमानाचा क्षण असेल. शिवरायांचा वैभवशाली इतिहास देश-विदेशात पोहचविण्यासाठी आम्ही सदैव कृतीशील प्रयत्न करीत आहोत.संभाजीराजे छत्रपती,खासदार 

टॅग्स :Sambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपतीkolhapurकोल्हापूरIndependence Dayस्वातंत्र्य दिवस