शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

कोल्हापूर : शिवाजी पुतळा सुशोभिकरण, चबुतऱ्याचा कॉलम तातडीने हटवणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2019 17:07 IST

अतिशय तणावपूर्ण वातावरणात गुरुवारी शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी पूतळा सुशोभिकरणाची पहाणी केली. त्यावेळी पुतळा अगर चबुतऱ्याला धक्का न लावता सुशोभिकरण करु, पुतळ्याची जागा बदलण्यासाठी शेजारी चबुतऱ्यांसाठी उभारलेला काँक्रीटचा कॉलम तातडीने हटविला जाईल असे आश्वासन शहर अभियंता व इतर अधिकाऱ्यांनी स्वांतत्र्यसैनिक आणि कृती समितीच्या शिष्ठमंडळास दिले. त्यामुळे ऐतिहासिक शिवाजी पुतळा आणि चबुतऱ्यांची जागा बदलण्याचा प्रयत्न दक्ष नागरीकांमुळे महापालिका प्रशासनास मागे घ्यावा लागला.पहाणीवेळी आमदार क्षीरसागर समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित झाल्याने तणाव निर्माण झाला होते.

ठळक मुद्देशिवाजी पुतळा सुशोभिकरण, चबुतऱ्याचा कॉलम तातडीने हटवणारआमदार समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित; पहाणीवेळी तणावाचे वातावरण

कोल्हापूर : अतिशय तणावपूर्ण वातावरणात गुरुवारी शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी पूतळा सुशोभिकरणाची पहाणी केली. त्यावेळी पुतळा अगर चबुतऱ्याला धक्का न लावता सुशोभिकरण करु, पुतळ्याची जागा बदलण्यासाठी शेजारी चबुतऱ्यांसाठी उभारलेला काँक्रीटचा कॉलम तातडीने हटविला जाईल असे आश्वासन शहर अभियंता व इतर अधिकाऱ्यांनी स्वांतत्र्यसैनिक आणि कृती समितीच्या शिष्ठमंडळास दिले. त्यामुळे ऐतिहासिक शिवाजी पुतळा आणि चबुतऱ्यांची जागा बदलण्याचा प्रयत्न दक्ष नागरीकांमुळे महापालिका प्रशासनास मागे घ्यावा लागला.पहाणीवेळी आमदार क्षीरसागर समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित झाल्याने तणाव निर्माण झाला होते.छत्रपती शिवाजी पुतळास ऐतिहासिक महत्व असल्याने हा पुतळा अगर चबुतरा हालव नये. चबुतऱ्यांची जागा बदलल्यास तेथील इतिहास दडला जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर बुधवारी स्वांतत्र्यसैनिक आणि कृती समितीच्या शिष्ठमंडळाने निवासी उपजिल्हाधिकाारी संजय शिंदे यांची भेट घेऊन पुतळा व चबुतरा हलवू नये अशी मागणी केली होती.त्यात गुरुवारी सुशोभिकरणाची पहाणी करण्याचे ठरले.गुरुवारी दुपारी कृती समितीचे निवास साळोखे, अशोक पोवार, रमेश मोरे, खादी ग्रामोद्योगचे सुंदर देसाई, अर्जून नलवडे, व्ही. डी. माने हे शिवाजी चौकात जमले. त्याची चाहूल लागताच महापालिकेच्या दिश्ोने शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, उपअभियंता एस. के. माने, आर्कीटेक्ट सूरुज जाधव, ठेकेदार अतुल मिरजकर या अधिकाऱ्यांसह आमदार समर्थक शिवसैनिक माजी उपमहापौर रविकिरण इंगवले, सुनिल जाधव, राहूल बलदोडे आदी सुमारे १०० हूनजण चौकात आले. त्यामुळे तणावाचे वातावरण झाले.दरम्यान, कृती समितीचे कार्यकर्ते, स्वातंत्रसैनिक व महापालिकेचे अधिकारी, कॉन्ट्रॅक्टर तसेच रविकिरण इंगवले, सुनिल जाधव यांनी सुशोभिरण परिसराची पहाणी केली. यावेळी निवास साळोखे, अशोक पोवार, रमेश मोरे, खादी ग्रामोद्योगचे सुंदर देसाई, अर्जून नलवडे, व्ही. डी. माने, सुंदर देसाई, अशोक रामचंदाणी, फिरोजखान उस्ताद, दिलीप माने, संभाजी जगदाळे, श्रीकांत भोसले, रवि चव्हाण, सुनिल मोहिते आदी उपस्थित होते.

टॅग्स :Shivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजkolhapurकोल्हापूरMuncipal Corporationनगर पालिका