शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : शिवाजी पूल : दुसऱ्या दिवशीही काम सुरू; शाहूकालीन हौद उतरविला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2018 17:41 IST

पर्यायी शिवाजी पुलाचे काम दुसऱ्यां दिवशीही सुरूच राहिले. मंगळवारी राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी आणि सर्वपक्षीय कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी कामाची पाहणी करून काही सूचना केल्या. दरम्यान, पुलाशेजारील शाहूकालीन हौद उतरविला असून, दोन दिवसांत पर्यायी पुलाच्या अर्धवट राहिलेल्या मुख्य कामाला प्रारंभ होईल.

ठळक मुद्देशिवाजी पूल : दुसऱ्या दिवशीही काम सुरू; शाहूकालीन हौद उतरविलादोन दिवसांत पर्यायी पुलाच्या मुख्य कामाला प्रारंभ

कोल्हापूर : पर्यायी शिवाजी पुलाचे काम दुसऱ्यां दिवशीही सुरूच राहिले. मंगळवारी राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी आणि सर्वपक्षीय कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी कामाची पाहणी करून काही सूचना केल्या. दरम्यान, पुलाशेजारील शाहूकालीन हौद उतरविला असून, दोन दिवसांत पर्यायी पुलाच्या अर्धवट राहिलेल्या मुख्य कामाला प्रारंभ होईल.पर्यायी शिवाजी पुलाचे काम ८० टक्के पूर्ण होऊन उर्वरित काम ‘पुरातत्त्व’ विभागाच्या कायदेशीर अडचणींमुळे २०१५ पासून अडकले होते. याबाबत सर्वपक्षीय नागरी कृती समितीतर्फे तीव्र आंदोलन केले होते. त्यानंतर पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांच्या पुढाकाराने सोमवार (दि. २१)पासून काम सुरू करण्यात आले.

पुलाच्या कामाची परवानगी मिळण्याबाबत अधीक्षक मोहिते हे पुरातत्त्व विभागाच्या संपर्कात असून, पुलाच्या कामाबाबत कायदेशीर मार्ग काढण्याचे काम सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर कृती समितीशी चर्चा केल्यानंतर सोमवारपासून पुलाचे शहराच्या बाजूने काम सुरू करण्यात आले.

पहिल्या टप्प्यात पुलाच्या चौकातील पर्यायी पुलाला अडथळा ठरणारा शाहूकालीन पाण्याचा हौद जेसीबी यंत्राद्वारे उतरविण्यात आला. त्यानंतर तेथे सपाटीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे.मंगळवारी सकाळी राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता व्ही. आर. कांडगावे, उपअभियंता आबदार यांनी कामाची पाहणी केली. त्यानंतर मुख्य कामाला प्रारंभ करण्यात येणार असल्याने बुधवारी ‘लाईनआउट’चे काम करून घेण्यात येणार असल्याचे ठेकेदारांना सांगून सूचना दिल्या. त्यानंतर कृती समितीचे निमंत्रक आर. के. पोवार, बाबा पार्टे, आदींनी येऊन पुलाच्या कामाची पाहणी केली.दरम्यान, येत्या दोन दिवसांत पर्यायी पुलाच्या अर्धवट राहिलेल्या पुलाच्या मुख्य कामाला प्रारंभ होणार आहे. ‘पुरातत्त्व’च्या नियमांना बाधा न आणता कॉलमऐवजी भिंत बांधून त्यावर आधारित पूल उभारण्यात येणार आहे. त्या दृष्टीने ठेकेदार एन. डी. लाड हे ‘आसमास’ कंपनीकडून मार्गदर्शन घेत आहेत.

 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरcollectorतहसीलदारpwdसार्वजनिक बांधकाम विभागMuncipal Corporationनगर पालिकाArchaeological Survey of Indiaभारतीय पुरातत्व सर्वेक्षण