शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : कचऱ्यासाठी जागेकरिता शिरोली, नागाव ग्रामपंचायतींनी प्रस्ताव द्यावेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2018 17:43 IST

हातकणंगले तालुक्यातील शिरोली, नागाव येथे रस्त्यावरच कचरा टाकला जातो. यामुळे त्रास होत असल्याच्या भावना उद्योजकांनी जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांच्यासमोर शनिवारी व्यक्त केल्या. त्यावर कचरा टाकण्यासाठी जागा मागणीचा प्रस्ताव संबंधित ग्रामपंचायतींनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून द्यावेत, असे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले.

ठळक मुद्देकचऱ्यासाठी जागेकरिता शिरोली, नागाव ग्रामपंचायतींनी प्रस्ताव द्यावेत जिल्हाधिकारी कार्यालयात ‘उद्योग मित्र’ बैठक

कोल्हापूर : हातकणंगले तालुक्यातील शिरोली, नागाव येथे रस्त्यावरच कचरा टाकला जातो. यामुळे त्रास होत असल्याच्या भावना उद्योजकांनी जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांच्यासमोर शनिवारी व्यक्त केल्या. त्यावर कचरा टाकण्यासाठी जागा मागणीचा प्रस्ताव संबंधित ग्रामपंचायतींनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून द्यावेत, असे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले.जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील ‘एमआयडीसी’मधील समस्यांवर चर्चा करण्यासाठी आयोजित ‘उद्योग मित्र’ बैठकीत ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.

महापालिका आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, जिल्हा परिषदेच्या प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी सुषमा देसाई, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) राजेंद्र भालेराव, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक एस. बी. शेळके, स्मॅकचे अध्यक्ष राजू पाटील, आदींची प्रमुख उपस्थिती होती.बैठकीत जिल्ह्यातील सर्व ‘एमआयडीसी’मधील अडचणी व विविध प्रश्नांचा आढावा घेण्यात आला. यामध्ये अंतर्गत रस्त्यांची स्थिती, ‘ईएसआय’ हॉस्पिटल, आदी प्रश्नांवर चर्चा झाली. तसेच शिरोली एमआयडीसीमधील उद्योजकांनी शिरोली व नागाव येथे रस्त्यावरच कचरा टाकला जात असल्याने त्रास होत असल्याचे निदर्शनास आणून दिले.

यावर काही तरी मार्ग काढावा, असे सांगितले. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित ग्रामपंचायतींच्या ग्रामविकास अधिकाऱ्यांना याबाबत विचारणा करून गावात उपलब्ध जागा आहे का अशी विचारणा केली. त्यावर गायरानाची जागा शिल्लक असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले.

जागा उपलब्ध असेल तर कचरा टाकण्यासाठी जागा मागणीचा प्रस्ताव आपल्याकडे सादर करावा, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाला दिले.यावेळी ‘एमआयडीसी’, सार्वजनिक बांधकाम विभाग, महावितरण, जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसह जिल्ह्यातील विविध एमआयडीसीचे पदाधिकारी व उद्योजक उपस्थित होते. 

 

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीkolhapurकोल्हापूर