शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर-शिर्डी रेल्वे बुधवारपासून--धनंजय महाडिक यांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2017 00:46 IST

कोल्हापूर : गेले तीन वर्षे पाठपुरावा केल्यानंतर कोल्हापूर ते साईनगर (शिर्डी) रेल्वे सुरू करण्यास रेल्वे खात्याने मान्यता दिली असून, दर बुधवारी सायंकाळी ४.३५ वाजता

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : गेले तीन वर्षे पाठपुरावा केल्यानंतर कोल्हापूर ते साईनगर (शिर्डी) रेल्वे सुरू करण्यास रेल्वे खात्याने मान्यता दिली असून, दर बुधवारी सायंकाळी ४.३५ वाजता कोल्हापुरातून सुटणार असल्याची माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. कोल्हापूर-शिर्डी रेल्वेस बुधवारी (दि. २७) सुरुवात होणार असून, पहिल्या टप्प्यात आठवड्यातून एक वेळच धावणार असली तरी प्रवाशांचा प्रतिसाद पाहून फेºया वाढविल्या जातील, असेही त्यांनी सांगितले.

रेल्वेच्या प्रलंबित प्रश्नांबाबत पुणे येथे मध्य रेल्वेच्या विभागीय प्रबंधकांच्या कार्यालयात शुक्रवारी बैठक झाली. यामध्ये कोल्हापूर-शिर्डी गाडीचा विषय लावून धरल्यानंतर त्याला तत्काळ मान्यता देण्यात आली. कोल्हापूर-नागपूर धावणारी गाडी मिरज येथे ३२ तास थांबते, या वेळेचा उपयोग करून कोल्हापूर-शिर्डी गाडी सुरू केली आहे. सध्या हॉलिडे स्पेशल म्हणून दर बुधवारी सायंकाळी ४.३५ वाजता छत्रपती शाहू महाराज टर्मिनस येथून निघणार असून, गुरुवारी पहाटे ५.५५ वाजता ती साईनगर येथे पोहोचेल. सव्वातीन तासांच्या विश्रांतीनंतर पुन्हा तीच गाडी सकाळी ८.२५ वाजता तेथून निघून रात्री ९.२५ वाजता कोल्हापुरात पोहोचेल. दीड दिवसात अल्प तिकीट दरात साई दर्शन करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. मिरज, सांगली, सातारा, पुणे, दौंड, अहमदनगर या प्रमुख स्थानकांमध्ये रेल्वेचे थांबे आहेत. सहा जनरल डबे, सात स्लिपर कोच, वातानुकूलित थ्री टायर दोन डबे, द्वितीय श्रेणीतील वातानुकूलित एक डबा असे १६ डबे राहणार आहेत.

कोल्हापूर-अहमदाबाद या मार्गावर आठवड्यातून दोन वेळा रेल्वे सोडण्यात यावी, कोल्हापूर-जोधपूर मार्गावर नवीन गाडी सुरू करावी, कोल्हापूर-सोलापूर ही रेल्वे सकाळच्या वेळेत सुरू करावी, फुटओव्हर ब्रीजच्या दोन्ही बाजूला यांत्रिकी सरकते जिने पूर्ण करावेत, आदी मागण्या पुण्यातील बैठकीत केल्याचेही त्यांनी सांगितले. संसदरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल महाडिक यांचा सत्कार रेल्वे प्रशासनाच्या वतीने करण्यात आला. स्टेशन प्रबंधक सुग्रीव्ह मीणा, शिवनाथ बियाणे, समीर शेठ, मोहन शेटे उपस्थित होते....तर गजपती राजूंवर हक्कभंगकोल्हापूरच्या विमानसेवेबाबत गेले तीन वर्षे प्रयत्न सुरू आहेत. पावसाळी अधिवेशनात नागरी विमान उड्डाण मंत्री गजपती राजू यांनी १५ सप्टेंबरपर्यंत विमान सेवा सुरू करण्याचे लोकसभेत सांगितले होते. सध्या तांत्रिक बाबीत ही प्रक्रिया अडकली असून, विमान सेवा लवकर सुरू झाली नाहीतर राजूंवर हक्कभंग आणण्याची तयारीही केल्याचे महाडिक यांनी सांगितले.महालक्ष्मी-अंबाबाई वाद निरर्थकमहालक्ष्मी की अंबाबाई हा वाद माझ्या दृष्टीने निरर्थक आहे. कोणी देवी म्हणेल, आई, लक्ष्मी, महालक्ष्मी म्हणण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. ‘महालक्ष्मी एक्स्प्रेस’चे नाव बदलणे एवढे सोपे नसल्याचे महाडिक यांनी सांगितले.बुधवारी साई मंदिरात लाडू वाटपकोल्हापूर-शिर्डी गाडीचा प्रारंभ बुधवारी होत असून, त्यानिमित्त जिल्ह्णातील साई मंदिरात लाडू वाटप केले जाणार आहे. प्रत्येक मंदिरात साधारणत: दोनशे लाडूंचे वाटप केले जाईल, असे महाडिक यांनी सांगितले.सहा महिन्यांत कोकण रेल्वेचे कामकोल्हापूर-वैभववाडीचा साडेतीन हजार कोटींचा प्रकल्प असून, त्याचे उद्घाटन तीन महिन्यांपूर्वीच तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते झाले. या प्रकल्पाचा विकास आराखडा कॅबिनेटच्या मंजुरीसाठी पाठविण्यात आला असून, मंजुरी व टेंडर प्रक्रिया यासाठी सहा महिन्यांचा कालावधी जाईल. त्यानंतरच कामास सुरुवात होईल, असे महाडिक यांनी सांगितले.जनरल - १७० रुपये, स्लिपर कोच-३३० रुपये,थ्री टायर ए.सी. - ९०५ रुपये, टू टायर ए. सी.- १२९५ रुपये.