शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरातील गर्भलिंग निदान प्रकरण: शिरगावच्या म्होरक्यासह पोवार बंधूंना अटक, डिजिटल सोनोग्राफी मशीन जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2023 15:53 IST

विक्रीसाठी बंदी असलेले डिजिटल सोनोग्राफी मशीन पोवार याला कुठून मिळाले, त्याचा शोध घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू

कोल्हापूर : गर्भलिंग निदान आणि गर्भपात करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केल्यानंतर आता पोलिस या रॅकेटच्या मुख्य सूत्रधारापर्यंत पोहोचले आहेत. राधानगरी पोलिसांनी बुधवारी (दि. १) टोळीचा म्होरक्या हिंदुराव ऊर्फ दिलीप बाळासोा पोवार (वय ४०) याच्यासह त्याचा भाऊ विजय बाळासोा पोवार (३८, दोघे रा. शिरगांव, ता. राधानगरी) यांना अटक केली. संशयितांकडून पोलिसांनी एक डिजिटल सोनोग्राफी मशीन जप्त केल्याची माहिती पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी दिली.राधानगरीच्या पोलिस निरीक्षक स्वाती गायकवाड यांच्यासह एस. एम. यादव, उपनिरीक्षक विजयसिंह घाटगे, के. डी. लोकरे, हवालदार बी. डी. पाटील, सुरेश मेटिल, सचिन पारखे, गजानन गुरव, रोहित खाडे, आदींच्या पथकाने अटकेची कारवाई केली.

मशीन खरेदीची होणार चौकशीविक्रीसाठी बंदी असलेले डिजिटल सोनोग्राफी मशीन पोवार याला कुठून मिळाले, त्याचा शोध घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. या मशीनची किंमत सुमारे १५ ते २० लाख रुपये आहे. मशीन उपलब्ध करून देण्यात काही डॉक्टर किंवा औषध वितरकांचा सहभाग असावा, असा पोलिसांना संशय आहे.

१४ जणांना अटकराधानगरी आणि भुदरगड पोलिसांनी या गुन्ह्यात आजपर्यंत १४ जणांना अटक केली. त्यात एका डॉक्टरसह काही बोगस डॉक्टर, एजंट आणि सोनोग्राफी मशीन चालवणाऱ्या व्यक्तींचा समावेश आहे.

पोवार बंधूंची कोट्यवधींची कमाईमुख्य संशयित आरोपी पोवार बंधू यांचा शिरगावमध्ये दीड ते दोन कोटी रुपयांचा अलिशान बंगला आहे. त्याशिवाय काही महागड्या चारचाकी गाड्याही त्यांच्याकडे आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली. विशेष म्हणजे विजय पोवार याला यापूर्वीही याच गुन्ह्यात अटक झाली होती. मात्र, त्यानंतरही तो पुन्हा याच गुन्ह्यात सक्रिय आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPregnancyप्रेग्नंसी