शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : निम्म्या शहरात पाण्याचा ठणठणाट, बालिंगा जलशुद्धीकरण केंद्रात शॉर्टसर्किट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2018 17:09 IST

कोल्हापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या बालिंगा जलशुद्धीकरण केंद्रात शुक्रवारी सायंकाळपासून शनिवारी सकाळपर्यंत तब्बल तीन वेळा शॉर्टसर्किट होऊन विद्युतपुरवठा खंडित झाल्यामुळे जलशुद्धीकरण केंद्र बंद राहिले. परिणामी, शनिवारी निम्म्या शहराचा पाणीपुरवठा झाला नाही.

ठळक मुद्दे निम्म्या कोल्हापूर शहरात पाण्याचा ठणठणाट, बालिंगा जलशुद्धीकरण केंद्रात शॉर्टसर्किट

कोल्हापूर : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या बालिंगा जलशुद्धीकरण केंद्रात शुक्रवारी सायंकाळपासून शनिवारी सकाळपर्यंत तब्बल तीन वेळा शॉर्टसर्किट होऊन विद्युतपुरवठा खंडित झाल्यामुळे जलशुद्धीकरण केंद्र बंद राहिले. परिणामी, शनिवारी निम्म्या शहराचा पाणीपुरवठा झाला नाही. मनपा प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे उद्भवलेल्या या प्रकारामुळे नागरिकांची मात्र ऐन पावसाळ्यात चांगलीच गैरसोय झाली.कोल्हापूर शहरातील नागरिकांना पाणीपुरवठा करण्याकरिता भोगावती नदीवर बालिंगा येथे उपसा केंद्र, तसेच जलशुद्धीकरण केंद्र बांधण्यात आले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून दोन्ही केंद्रे अव्याहतपणे सुरू आहेत.

या जलशुद्धीकरण केंद्रातून चंबुखडी येथील पाण्याच्या टाकीत पाणी नेऊन तेथून निम्म्या शहराला पाणीपुरवठा केला जातो. त्यामध्ये काही उपनगरे, तसेच संपूर्ण ‘सी’ व ‘डी’ वॉर्डाचा समावेश आहे.

जलशुद्धीकरण केंद्राला वीजपुरवठा करणाऱ्या वाहिन्यांना त्याखालील झाडांच्या फांद्यांचा स्पर्श होत होता. हा स्पर्श झाला की, विद्युतपुरवठा आणि जलशुद्धीकरण केंद्र बंद पडायचे. शुक्रवारी सायंकाळी पावणेपाच ते रात्री साडेअकरा या वेळेत पहिल्यांदा विद्युतपुरवठा खंडित झाला.

त्यानंतर मध्यरात्री एक ते पहाटे तीन आणि शनिवारी सकाळी पावणेसात ते सकाळी सव्वानऊ अशा तीन वेळा विद्युतपुरवठा खंडित झाला. त्यामुळे जलशुद्धीकरणाची प्रक्रियाही बंद राहिली.झाडांच्या फांद्यांचा स्पर्श झाला की, शॉर्टसर्किट होत असल्याने या फांद्या तोडण्याचे काम हाती घेण्यात आले. त्यामुळे पुन्हा सकाळी अकरा ते दुपारी दोन वाजेपर्यंत विद्युतपुरवठा बंद ठेवावा लागला.

तीन वेळा जलशुद्धीकरण केंद्र बंद पडल्याने त्याचा परिणाम शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यावर झाला. चंबुखडीची टाकी पूर्ण क्षमतेने भरली की, व्यवस्थित पाणीपुरवठा होतो; पण वारंवार वीजपुरवठाच खंडित होत राहिल्याने चंबुखडी येथील टाकी भरलीच नाही. त्यामुळे पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले.शनिवारी सकाळी ज्या भागात पाणी देण्यात येते तेथे पाणीच आले नाही. त्यामुळे नागरिकांची गैरसोय झाली. अनपेक्षित पाणी गायब झाल्याने नागरिक हैराण झाले. घरात पाण्याचा ठणठणाट जाणवू लागला. शनिवारी सायंकाळनंतर कोठे पाणी आले आणि कोठे आले नाही, अशी विचित्र परिस्थिती निर्माण झाली.चंबुखडी पाण्याच्या टाकीतून फुलेवाडी रिंगरोड, लक्षतीर्थ वसाहत, कणेरकरनगर, सानेगुरुजीनगर, आपटेनगर, राजोपाध्येनगर, तुळजाभवानी कॉलनी, शिवाजी पेठेचा काही भाग, तसेच संपूर्ण ‘सी’ व ‘डी’ वॉर्ड परिसरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला.

रंकाळा टॉवर ते आझाद चौक आणि शुक्रवार पेठ ते दसरा चौक परिसरात विस्तारलेल्या ‘सी’ आणि ‘डी’ वॉर्डात लोकवस्ती मोठी आहे. परिणामी, निम्मे शहर चंबुखडी टाकीवर अवलंबून आहे. त्यामुळे पाणीपुरवठा खंडित झाल्याचा परिणाम झाला. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ही घटना घडली आहे. परिणामी, झाडांच्या फांद्या वेळोवेळी तोडल्या असत्या, तर शॉर्टसर्किट झालेच नसते.

 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर