शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
4
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
5
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
6
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
7
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
8
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
9
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
10
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
11
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
12
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
13
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
14
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
15
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
16
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
17
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
18
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
19
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
20
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त

कोल्हापूर : शेंडा पार्क जागेचा प्रस्ताव शासनाला लवकर पाठवू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2018 18:15 IST

मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापुरात उभारण्यासाठी शेंडा पार्क येथील जागेचा प्रस्ताव लवकरच शासनाला पाठवू, अशी ग्वाही पुणे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी खंडपीठ कृती समितीला सोमवारी दिले.

ठळक मुद्दे शेंडा पार्क जागेचा प्रस्ताव शासनाला लवकर पाठवूविभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांची खंडपीठ कृती समितीला ग्वाही

कोल्हापूर : मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापुरात उभारण्यासाठी शेंडा पार्क येथील जागेचा प्रस्ताव लवकरच शासनाला पाठवू, अशी ग्वाही पुणे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी खंडपीठ कृती समितीला सोमवारी दिले.कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर या सहा जिल्ह्यांसाठी होणाऱ्या सर्किट बेंचसाठी कोल्हापुरात शेंडा पार्कातील सुमारे ७५ एकरांची विस्तीर्ण जागा निश्चित करण्यात यावी, अशी मागणी गेल्या महिन्यात मुंबई येथे खंडपीठ कृती समितीच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर हे ११ जुलैला कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. त्यांनी खंडपीठ कृती समितीला सोमवारच्या बैठकीचे निमंत्रण दिले आहे, त्यानुसार दुपारी एकच्या सुमारास त्यांच्या दालनात बैठक पार पडली.यावेळी डॉ. म्हैसेकर म्हणाले, खंडपीठ कृती समिती व शासन यांचा पत्रव्यवहार तपासून संबंधित अधिकाऱ्यांना सर्किट बेंचचे काम आहे; त्यामुळे सर्व कागदपत्रांची छाननी पूर्ण करून फाईल तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मी २०१२ मध्ये जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर असताना शेंडा पार्क येथील जागा पाहिली आहे.जागेचा प्रस्ताव कमी वेळेत शासनाला सादर केला जाईल, अशी ग्वाही दिली. बैठकीस उपायुक्त प्रताप जाधव, कृती समितीचे निमंत्रक अ‍ॅड. प्रशांत चिटणीस, उपाध्यक्ष सुशांत गुडाळकर, अभिषेक देवरे, विवेक घाटगे, विजय पाटील, आदी उपस्थित होते.मुख्यमंत्र्यांची सूचना आणि बैठकमुख्यमंत्री फडणवीस यांनी शेंडा पार्कमधील जागेबाबत कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार करण्याच्या सूचना विधि व न्याय विभागाला दिल्या होत्या. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाशी पत्रव्यवहार करण्यात आला असून, शेंडा पार्क येथे मागणीप्रमाणे ७५ एकर एवढी जागा वाटपासाठी उपलब्ध आहे काय? असल्यास त्याबाबत योग्य ती तपासणी करून जागा मागणीचा प्रस्ताव स्पष्ट अभिप्रायासह पुणे विभागीय आयुक्तांमार्फत शासनास पाठवावा, अशा सूचना केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर ही बैठक झाली.

 

टॅग्स :Courtन्यायालयkolhapurकोल्हापूर