शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर :  सुरक्षा रक्षकांचे काठी आपट आंदोलन, सहा. कामगार आयुक्त कार्यालयासमोर निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 16:20 IST

कोल्हापूर : राज्यातील १४ सुरक्षा रक्षक मंडळे एकत्रीकरण करावे, पगारवाढ करावी, दर्जेदार खाकी गणवेश असावा आदी मागण्यांसाठी महाराष्ट्र सुरक्षा रक्षक ...

ठळक मुद्देसुरक्षा रक्षकांचे काठी आपट आंदोलन, सहा. कामगार आयुक्त कार्यालयासमोर निदर्शने पगारात भरघोस वाढीचे आश्वासन

कोल्हापूर : राज्यातील १४ सुरक्षा रक्षक मंडळे एकत्रीकरण करावे, पगारवाढ करावी, दर्जेदार खाकी गणवेश असावा आदी मागण्यांसाठी महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महासंघाच्यावतीने सोमवारी सकाळी शाहुपूरीतील सहायक कामगार आयुक्त कार्यालयासमोर सुरक्षा रक्षकांनी रस्त्यावर काठी आपट आंदोलन निदर्शने केले.

सहायक कामगार आयुक्त अनिल गुरव यांच्याशी चर्चा करताना त्यांनी, पगारवाढीची नोटीस पाठवली असून सुरक्षा रक्षकांच्या पगारामध्ये भरघोस वाढ होईल असे आश्वासन दिले. तसेच इतर मागण्यांबाबत वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करु असे सांगितले. यावेळी सुरक्षा रक्षक राज्य सल्लागार समितीचे सदस्य अ‍ॅड. विशाल मोहिते हेही प्रमुख उपस्थित होते.राज्यातील सुरक्षा रक्षक मंडळातील रक्षकांना खाकी गणवेश देण्याबाबतचा निर्णय राज्य सुरक्षा रक्षक सल्लागार मंडळाच्या बैठकीत गेल्याच वर्षी झाला. त्यानुसार मंडळाकडील ८० लाखाचे शिल्लक असलेले कापड गणवेशसाठी निश्चित केले. पण तरीही निळ्या कापडासाठी निवीदा का काढली? असा प्रश्न सुरक्षा रक्षकांना पडला.

सुरक्षा रक्षक कार्यरत असताना अतिक्रमण झालेली आस्थापने रद्द करावीत आदी मागण्यासाठी सोमवारी सकाळी शाहूपुरीतील सहायक कामगार आयुक्त कार्यालयासमोर सुरक्षा रक्षकांनी भारतीय मजदूर संघ सलग्न सुरक्षा रक्षक महासंघाच्यावतीने रस्त्यावर काठी आपटत निदर्शने केली. यावेळी आंदोलकांनी गळ्यात भगवे स्कॉर्प व भगवे झेंडे घेतले होते.त्यानंतर महासंघाच्या शिष्ठमंडळाने सहायक कामगार आयुक्त अनिल गुरव यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी सुरक्षा रक्षक राज्य सल्लागार समिती सदस्य अ‍ॅड. विशाल मोहितेही प्रमुख उपस्थित होते. यावेळी सुरक्षा रक्षकांच्या मागण्यांबाबत वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करण्याचे आश्वासन देण्यात आले. याशिवाय सुरक्षा रक्षकांच्या पगारवाढीबाबत नोटीस काढली असून लवकरच पगार १७५० ते २०५० रुपयेपर्यत वाढ होईल असे आश्वासन दिले.आंदोलनात भारतीय मजदूर संघाचे जिल्हाध्यक्ष एस.एन. पाटील, जिल्हा सरचिटणीस अभिजीत केकरे, कार्याध्यक्ष मुकूंदराव जोशी, राज्य सुरक्षा रक्षक महासंघाचे उपाध्यक्ष संदिप पाटील, अ‍ॅड. अनुजा धरनगावकर, प्रमोद बागडी, राम बोडके, महमंद शिदवणकर, अभिजीत पाटील, शिवाजी पाटील, नितेश पाटील, रमेश पाटील, प्रकाश भारमल, प्रफुल्ल मेढे आदी उपस्थित होते.

सुरक्षा रक्षकांच्या मागण्या...

  1.  राज्यातील १४ सुरक्षा रक्षक मंडळे एकत्रीकरण करावे,
  2. सल्लागार मंडळाच्या बैठकीतील निर्णयानुसार दर्जेदार खाकी गणवेश मिळावा
  3. पगार प्रत्येक महिन्याच्या ७ तारखेला मिळावा, पगारवाढ मिळावी
  4. सुरक्षा रक्षकांना नोंदणीक्रमांक मिळावा
  5. ई.एस.आय.सी. आणि ग्रॅज्युटीची अंमलबजावणी करावी

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMorchaमोर्चा