शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : आंतर जिल्हा फुटबॉल स्पर्धेचे दुसऱ्यांदा ‘कोल्हापूर’कडे विजेतेपद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2018 12:11 IST

निखिल कुलकर्णी, प्रथमेश हेरेकर, सिद्धेश यादव, सूरज शिंगटे, संकेत साळोखे यांनी नोंदविलेल्या गोलच्या जोरावर के.एस.ए. कोल्हापूर जिल्हा संघाने नागपूर जिल्हा संघाचा ५-१ असा धुव्वा उडवत महाराष्ट्र राज्य आंतर जिल्हा पुरुष फुटबॉल स्पर्धेचे दुसऱ्यांदा अजिंक्यपद पटकाविले.

ठळक मुद्देआंतर जिल्हा फुटबॉल स्पर्धेचे दुसऱ्यांदा ‘कोल्हापूर’कडे विजेतेपदअंतिम सामन्यात नागपूर संघाचा ५-१ ने उडविला धुव्वा

कोल्हापूर : निखिल कुलकर्णी, प्रथमेश हेरेकर, सिद्धेश यादव, सूरज शिंगटे, संकेत साळोखे यांनी नोंदविलेल्या गोलच्या जोरावर के.एस.ए. कोल्हापूर जिल्हा संघाने नागपूर जिल्हा संघाचा ५-१ असा धुव्वा उडवत महाराष्ट्र राज्य आंतर जिल्हा पुरुष फुटबॉल स्पर्धेचे दुसऱ्यांदा अजिंक्यपद पटकाविले.नाशिक येथे वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनतर्फे आयोजित केलेल्या या स्पर्धेत कोल्हापूर संघाने पहिल्या फेरीत बीड संघावर १४-० असा, तर दुसऱ्या फेरीत धुळे संघावर ५-१ व अमरावतीवर १-० आणि उपांत्य फेरीत ४-३ असा पुणे संघाचा पराभव करीत अंतिम फेरी गाठली.

नागपूर संघाबरोबर झालेल्या अंतिम फेरीत कोल्हापूर संघाने ५-१ अशा गोलफरकाने विजय मिळवत विजेतेपद पटकाविले. यात ७ व्या मिनिटास कोल्हापूर संघाकडून सूरज शिंगटेने निखिल कुलकर्णीच्या पासवर गोल करीत संघास १-० अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर नागपूर संघाला मिळालेल्या पेनल्टीद्वारे गोल करीत संघास १-१ अशी बरोबरी साधण्यात यश आले.

उत्तरार्धात के.एस.ए.कडून निखिल कुलकर्णी, सिद्धेश यादव, प्रथमेश हेरेकर, संकेत साळोखे यांनी गोल करीत संघाची ५-१ अशी भक्कम आघाडी निर्माण केली. ही आघाडी कायम ठेवत कोल्हापूर संघाने सामन्यासह दुसऱ्यांदा विजेतेपद पटकाविले.

विशेष म्हणजे कोल्हापूर संघाकडून आकाश मेस्त्री याने उत्कृष्ट गोलरक्षण करीत संघास प्रोत्साहन दिले.बक्षीस वितरण वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनचे मानद सचिव साऊटर वाझ, आदी मान्यवरांच्या उपस्थितीत झाले.विजयी संघात आकाश मेस्त्री, निखिल कुलकर्णी, अनिकेत पोवार, अश्विन टाकळकर, सुनीत पाटील, सौरभ हारुगले, हरीष पाटील, सिद्धेश यादव, श्रेयस मोरे, सूरज शिंगटे, संकेत साळोखे, स्वराज्य नाईक, सोमेश पाडळकर, सुयश हांडे, शुभम जाधव, शाहू भोईटे, प्रतीक बदामे, प्रथमेश हेरेकर, पवन माळी, मसूद मुल्ला व मार्गदर्शक राजेंद्र घारगे, गजानन मनगुतकर यांचा समावेश होता.

 

 

टॅग्स :Footballफुटबॉलkolhapurकोल्हापूर