शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
2
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
3
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
4
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
5
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
6
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
7
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
8
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
9
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
12
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
13
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
14
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
15
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
16
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
17
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
18
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
19
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
20
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."

कोल्हापूर : विक्रेत्याच्या डोक्यात फोडली बाटली, चौघा फाळकूटादादांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2018 18:30 IST

वर्दळीच्या ताराबाई रोडवरील बाबूजमाल दर्ग्याजवळ पॉपकॉर्नचे पैसे मागितल्याचा राग मनात धरून चौघा फाळकूटदादांनी विक्रेत्याच्या डोक्यात शीतपेयाची बाटली फोडून गंभीर जखमी केले.

ठळक मुद्देविक्रेत्याच्या डोक्यात फोडली बाटली, ताराबाई रोडवरील प्रकार चौघा फाळकूटादादांवर गुन्हा

कोल्हापूर : वर्दळीच्या ताराबाई रोडवरील बाबूजमाल दर्ग्याजवळ पॉपकॉर्नचे पैसे मागितल्याचा राग मनात धरून चौघा फाळकूटदादांनी विक्रेत्याच्या डोक्यात शीतपेयाची बाटली फोडून गंभीर जखमी केले.

अमर विजय सरनाईक (वय ४८, रा. अरुण सरनाईकनगर, आपटेनगर) असे जखमीचे नाव आहे. शुक्रवारी (दि. १४) दुपारी हा प्रकार घडला. या प्रकरणी श्रीधर, राजू पाटील व अन्य दोघे अनोळखी अशा चौघा फाळकूटदादांवर जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.अधिक माहिती अशी, अमर सरनाईक याचा पॉपकॉर्नचा गाडा आहे. ताराबाई रोडवर बाबूजमाल दर्ग्याजवळ एका चित्रपटगृहाच्या बाहेर थांबून ते पॉपकॉर्न विक्री करतात. शुक्रवारी दुपारी श्रीधर, राजू पाटील व अन्य दोघे असे चौघे फाळकूटदादा तेथे गेले. चौघांनी चार प्लेट पॉपकॉर्न खाल्ले. पैसे न देता ते जात असताना अमर याने त्यांच्याकडे पैशाची मागणी केली. त्यावेळी चौघांनी त्याला शिवीगाळ करीत बेदम मारहाण केली.

यावेळी श्रीधर याने शीतपेयाची बाटली अमर याच्या डोक्यात फोडून गंभीर जखमी केले. हा प्रकार सुरू असताना नागरिकांनी गर्दी केली. यावेळी संशयितांनी तेथून धूम ठोकली. याप्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक मानसिंह खोचे करीत आहेत. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर