शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
2
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
3
“शेतकऱ्यांना मोफत नको म्हणणाऱ्या अजित पवारांना फुकटात जमिनी लाटण्याचा भस्म्या”: काँग्रेस
4
एकनाथ शिंदेंचा अजितदादांना धक्का! २५ सरपंच, पदाधिकाऱ्यांसह बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश
5
राजस्थानमध्ये पकडला गेला 'ओसामा'; इंटरनेट कॉलिंगवर ४ वर्षांपासून होता अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांच्या संपर्कात
6
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
7
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
8
अग्रलेख: लोकशाहीवरच प्रश्नचिन्ह! एच-फाईल्स अन् निवडणूक प्रक्रियेवरील विश्वासालाच तडा
9
गंगर कन्स्ट्रक्शनवर १०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; एकच फ्लॅट दोघांना विकला!
10
हास्यास्पद खर्चमर्यादा अन् पैशांची उधळपट्टी... आगामी निवडणुकांमध्ये रंगणार वर्चस्वाची लढाई
11
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
12
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
13
तोपर्यंत 'त्या' नागरिकाला मतदानाचा अधिकार नाही; युवतीच्या अर्जावर ६ आठवड्यांत निर्णय घ्या!
14
नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचे इंजिन पुन्हा धडधडले; मोठ्यांसह बच्चेकंपनी खूश; वेळापत्रकही जाहीर
15
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
16
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
17
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
18
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
19
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
20
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

कोल्हापूर : मुक परिक्रमेतून ‘ रंकाळा वाचवा’ ची साद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2018 17:31 IST

कोल्हापूर : रंकाळा संवर्धन, संरक्षण समिती व रंकाळा प्रेमींतर्फे रंकाळा दिवसानिमित्त कोल्हापूरचा श्वास व वैभव असणाऱ्या रंकाळा तलावातील वाढते ...

ठळक मुद्दे मुक परिक्रमेतून ‘ रंकाळा वाचवा’ ची सादलोकचळवळी उभी करण्याचा मानस

कोल्हापूर : रंकाळा संवर्धन, संरक्षण समिती व रंकाळा प्रेमींतर्फे रंकाळा दिवसानिमित्त कोल्हापूरचा श्वास व वैभव असणाऱ्या रंकाळा तलावातील वाढते जलप्रदूषण रोखण्यासाठी शासनाने त्वरीत पावले उचलावीत. या मागणीसाठी रंकाळा प्रेमींतर्फे मंगळवारी सकाळी मुक रंकाळा परिक्रमा काढण्यात आली.रंकाळा चौपाटी उद्यानातील नवनाथ मंदीरापासून सुरू झालेली ही परिक्रमा चौपाटी, रंकाळा टॉवर, संध्यामठ, इराणी खण, खणेश्वर, मार्गे पदपथ उद्यानात परिक्रमेचा समारोप झाला. गेल्या चार पाच वषार्पासून रंकाळ्याचे पाणी कमालीचे प्रदूषित झाले आहे.

मासे, कासवे आदी जलचर प्राणी मृत्युमुखी पडत आहेत. पाण्यावर हिरवा तवंग आला आहे. त्यामुळे जल प्रदूषण तात्काळ हटवावे. कोल्हापूरकरांचा श्वास असलेल्या ऐतिहासिक रंकाळ्याला पुर्नवैभव मिळवून देण्यासाठी रंकाळ्याचा कायमस्वरूपी ठोस विकास आराखडा राबवावा. असा सुर उपस्थितांमधून उमटला.डॉ.अमर आडके म्हणाले, रंकाळा विकासासाठी लोक चळवळ उभी रहायला हवी .रंकाळा संवर्धनाच्या कामासाठी लोकांचा सहभाग वाढायला हवा. रंकाळाक्षेत्र वर्षुनवर्ष कमी होऊ लागलेय ,हा धोका वेळीच ओळखायला हवा.रंकाळा प्रदूषणावर उपाय शोधण्याची गरज आहे. रंकाळ्यामुळे कोल्हापूकरांच्या आयुष्यातील एक श्वास वाढला आहे.

इराणीखणी पासून रंकाळा परिक्रमा पूर्ण करण्यासाठी जो मार्ग नाही तो निर्माण करूया.यावेळी रंकाळा प्रेमी व चित्रपट दिग्दर्शक यशवंत भालकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. प्रास्ताविक राजेंद्र पाटील यांनी केले.या परिक्रमेत आर्किटेक्ट असोसिएशनचे अध्यक्ष अजय कोराणे,चंद्रकांत वडगावकर, क्रीडाईचे संचालक सागर नालंग, अशोक देसाई,लोकमत चे मुख्य बातमीदार विश्वास पाटील,बी न्यूज चे वृत्त संपादक विजय कुंभार,दीपक पोलादे, संग्राम भालकर, सुभाष हराळे, संपतराव पाटील, धोंडीराम चोपडे, गुंडोपंत जितकर, प्रवीण वायचळ, जितेंद्र लोहार, शितल येळावकर, विजयमाला चिखलीकर, डॉ.रूपाली दळवी,  डॉ. सरदार पाटील, संभाजी पाटील आदी सहभागी झाले होते.

परिक्रमेचे नियोजन रंकाळा समितीचे अभिजीत चौगुले ,विजय सावंत, प्रा.एस.पी.चौगुले,यशवंत पाटील, राजेंद्र पाटील,सुधीर राऊत, राजेंद्र इनामदार यांनी केले.

 

 

टॅग्स :environmentवातावरणkolhapurकोल्हापूर