शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Milk Supply कोल्हापूर जिल्ह्यात दुध आंदोलन तीव्र, संघटना आक्रमक, कार्यकर्त्यांला दुधाने अंघोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2018 14:39 IST

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या पुकारलेल्या आंदोलनात मंगळवारी दुसऱ्या दिवशीही कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील शेतक-यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते मंगळवारी आक्रमक झाले आहेत.

ठळक मुद्देस्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आक्रमककोल्हापूर, सांगली जिल्ह्यात दुध आंदोलन तीव्र

कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या पुकारलेल्या आंदोलनात मंगळवारी दुसऱ्या दिवशीही कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील शेतक-यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते मंगळवारी आक्रमक झाले आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यातील उदगावमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दूधाचें सात ट्रॅकर फोडले, तर शिरढोणमध्ये स्वाभिमानी कार्यकर्त्यांचा दुधाने अंघोळ घालुन आंदोलन करण्यात आले.  

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दुधाची दरवाढ व शेतकऱ्यांच्या खात्यात थेट प्रति लीटर पाच रुपये जमा करण्याच्या मागणीसाठी पुकारलेल्या आंदोलनात प. महाराष्ट्रासह राज्यात शेतक-यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविल्याने, लाखो लीटर दुधाचे संकलन झाले नाही.  कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यात शेतक-यांनी दूधच न घातल्याने दूध संकलन जवळजवळ ठप्प झाले. कोल्हापूर जिल्ह्यातील दुधाचे टँकर पोलीस बंदोबस्तात रवाना झाले.

उदगावमध्ये दूधाचें सात ट्रॅकर फोडलेकोल्हापूर जिल्ह्यातील उदगावमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी मध्यरात्री 2 च्या सुमारास वारणेचे सात दूध वाहतूक करणारे ट्रॅकर फोडल्याने मध्यरात्री पासून उदगाव मध्ये तणाव निर्माण झाला आहे. त्यामुळे उदगावात सॅटेलाईट दूध डेअरीत दुधाचे टँकर पोलीस बंदोबस्तात रवाना झाले. 

उदगावमध्ये पोलीस फौज फाट्यासह बदोबस्त असून उदगाव मधील तीन दूध संघ पोलिसांनी व्यापला आहे. शिरढोणमध्येही कार्यकर्त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांला दुधाने अंघोळ घालुन आंदोलन करण्यात आले. 

टॅग्स :Milk Supplyदूध पुरवठाkolhapurकोल्हापूर