शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : राष्ट्रीय क्रीडादिनानिमित्त मशाल मिरवणूक उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2018 17:15 IST

कोल्हापूर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा हॉकी असोसिएशन यांच्यावतीने राष्ट्रीय क्रीडादिन व मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त शहराच्या प्रमुख मार्गावरुन क्रीडाज्योत प्रज्वलित करुन शहराच्या प्रमुख मार्गावरुन मिरवणूक काढण्यात आली. यात शहरातील विविध शाळांमधील विद्यार्थी, प्रशिक्षक, शिवछत्रपती पुरस्कार विजेते आदी सहभागी झाले होेते.

ठळक मुद्दे राष्ट्रीय क्रीडादिनानिमित्त मशाल मिरवणूक उत्साहातहजारो विद्यार्थ्यांसह प्रशिक्षकांचा सहभाग शहराच्या प्रमुख मार्गावरुन क्रीडा ज्योतीची मिरवणूक

कोल्हापूर : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा हॉकी असोसिएशन यांच्यावतीने राष्ट्रीय क्रीडादिन व मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त शहराच्या प्रमुख मार्गावरुन क्रीडाज्योत प्रज्वलित करुन शहराच्या प्रमुख मार्गावरुन मिरवणूक काढण्यात आली. यात शहरातील विविध शाळांमधील विद्यार्थी, प्रशिक्षक, शिवछत्रपती पुरस्कार विजेते आदी सहभागी झाले होेते.भवानी मंडप येथील राज्यातील एकमेव क्रीडा स्तंभाचे पूजन गोकूळचे ज्येष्ठ संचालक अरुण नरके यांच्या हस्ते पूजन झाले. त्यानंतर क्रीडा स्तंभापासून विद्यापीठ हायस्कूल, बिनखांबी गणेश मंदीर, खरी कॉर्नर, नंगीवली तालीम मंडळ, वारे वसाहत, संभाजी नगर तरुण मंडळ, निर्माण चौक ते मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम येथे ही मिरवणूक समाप्त झाली.

संपूर्ण मिरवणूक मार्गावर फुलांचे उधळण व क्रीडा घोष वाक्यांच्या गजरात स्वागत करण्यात आले. या रॅलीत महाराष्ट्र हायस्कूल, कोल्हापूर हायस्कूल, प्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हायस्कूल, स.म.लोहिया हायस्कूल, विमला गोयंका इंग्लिश मिडीयम स्कूल, न्यू इंग्लिश मिडीयम स्कूल, कोल्हापूर जिल्हा ज्युदो असोसिएशन, जिल्हा तलवारबाजी असोसिएशन, आदींनी सहभाग घेतला.

मशाल मिरवणूक सांगता समारंभात विविध खेळात प्राविण्य दाखविलेल्या ३२ खेळाडूं व शिवछत्रपती जीवन गौरव पुरस्कार विजेते बिभीषण पाटील, शिवछत्रपती पुरस्कार विजेते कुमार आगळगावकर, आर.डी.पाटील, शहाजी सुर्यवंशी, जागतिक बॉडी बिल्डींग स्पर्धेत सहभागी झालेले विजय मोरे, एकलव्य छत्रपती पुरस्कार विजेते अनिल पवार, आदी मान्यवरांचा पोलीस उपअधीक्षक सुरज गुरव यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. स्वागत व प्रास्ताविक जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रशेखर साखरे यांनी केले.यावेळी अजित पाटील, प्रदीप साळोखे, संदीप पाटील, रघू पाटील, विजय साळोखे (सरदार), विकास माने, बालाजी बरबंडे, विकास माने, सागर जाधव, व्ही.एस.भोयर, क्रीडा अधिकारी राजेंद्र घाडगे, प्रविण कोंढावळे, विकास माने, आदी मान्यवर उपस्थित होते.

 

 

टॅग्स :Governmentसरकारkolhapurकोल्हापूर