शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : गांधीनगरच्या व्यापाऱ्यास मारहाण करून लूटमार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2018 17:00 IST

गांधीनगर पोलीस ठाण्यात दाखल केलेली तक्रार मागे घेण्यासाठी कापड व्यापाऱ्यांस आठ ते दहा जणांनी वाटेत अडवून बेदम मारहाण केली. यावेळी त्यांच्या अंगावरील तीन तोळ्यांची चेन हिसकावून घेतली.

ठळक मुद्देगांधीनगरच्या व्यापाऱ्यास मारहाण करून लूटमार, रुईकर कॉलनी येथील घटना गांधीनगर येथील सुंदराणी टोळीवर गुन्हा : तक्रार मागे घेण्यासाठी धमकी

कोल्हापूर : गांधीनगर पोलीस ठाण्यात दाखल केलेली तक्रार मागे घेण्यासाठी कापड व्यापाऱ्यांस आठ ते दहा जणांनी वाटेत अडवून बेदम मारहाण केली. यावेळी त्यांच्या अंगावरील तीन तोळ्यांची चेन हिसकावून घेतली.

शामलाल आरतमल बचराणी (वय ६०, रा. स्वामी टेऊराम अपार्टमेंट, मसूबाबा रोड, गांधीनगर) असे जखमी व्यापाऱ्यांचे नाव आहे. सोमवारी (दि. ८) दुपारी रुईकर कॉलनी, परख हॉटेलच्या रिकाम्या मैदानाशेजारी ही घटना घडली.बचराणी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शाहूपुरी पोलिसांनी संशयित विक्रम सुंदराणी (३०), कैलाश सुंदराणी (२७), सागर सुंदराणी (२४, सर्व रा. गांधीनगर) यांच्यासह पाचजणांवर गुन्हा दाखल केला. पोलीस संशयितांचा शोध घेत आहेत, अशी माहिती शहर पोलीस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांनी दिली.अधिक माहिती अशी, शामलाल बचराणी यांचे गांधीनगरमध्ये कापड दुकान आहे. संशयित सुंदराणी टोळी ही त्यांच्याकडून दर महिन्याला दमदाटी करून हप्ता वसूल करीत असते. त्यांचा मुलगा रोशन दुकानात असताना या टोळीने दुकानातील साडेनऊ हजार रोकड आणि सोन्याची चेन जबरदस्तीने काढून घेतली होती. या प्रकरणी बचराणी यांनी सुंदराणी टोळीच्या विरोधात गांधीनगर पोलीस ठाण्यात लूटमारीची फिर्याद दिली होती.

या टोळीविरोधात अशा तीन ते चार तक्रारी दाखल आहेत. शामलाल सोमवारी सकाळी अकराच्या सुमारास मोपेडवरून तारीख असल्याने न्यायालयात आले. काम आवरून ते परत घरी जात असताना रुईकर कॉलनी येथील मैदानाशेजारी दबा धरून बसलेल्या टोळीने त्यांची मोपेड अडविली.

त्यांना ‘आमच्या विरोधात दिलेली गांधीनगर पोलीस ठाण्यातील तक्रार मागे घे; आज तुला जिवंत सोडत नाही,’ असे म्हणून बेदम मारहाण केली. यावेळी गळ्यातील तीन तोळ्यांची सोन्याची चेन हिसकावून घेत पळून गेले. भांबावलेल्या बचराणी यांनी याप्रकरणी शाहूपुरी पोलिसांत तक्रार दिली.सुंदराणी टोळी लूटमारीमध्ये पटाईतगांधीनगर व्यापारपेठेत अनेक व्यावसायिकांना सुंदराणी टोळीने लुटले आहे. दमदाटी आणि ठार मारण्याची धमकी देत व्यापाऱ्यांकडून हप्ते वसूल करण्यामध्ये ते पटाईत आहेत. फाळकूटदादा म्हणून त्यांची या परिसरात दहशत आहे.

या टोळीवर राजारामपुरी पोलीस ठाण्यात चेन स्नॅचिंगचाही गुन्हा दाखल आहे. सराईत गुन्हेगार असल्याने त्यांची गांधीनगर पोलीस ठाण्यात ऊठबस असते. पोलिसांचा धाक नसल्याने त्यांचे उपद्व्याप वाढत आहेत. या टोळीच्या दहशतीपुढे येथील व्यापारी हतबल झाले आहेत. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर