शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : औदुंबर पाटील यांना पूर्ववत कागलला आणा, अन्यथा आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 19:50 IST

कागलचे पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांनी कागल शहरात कायदा व सुव्यवस्था चांगली राखली आहे. त्यांची नियमबाह्य झालेली बदली रद्द करून त्यांना पूर्ववत कागल येथे रुजू करावे, अशी मागणी कागलमधील नागरिकांनी मंगळवारी केली.

ठळक मुद्देऔदुंबर पाटील यांना पूर्ववत कागलला आणा, अन्यथा आंदोलननागरिकांची मागणी : नांगरे-पाटील यांना भेटणार

कोल्हापूर : कागलचे पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांनी कागल शहरात कायदा व सुव्यवस्था चांगली राखली आहे. त्यांची नियमबाह्य झालेली बदली रद्द करून त्यांना पूर्ववत कागल येथे रुजू करावे, अशी मागणी कागलमधील नागरिकांनी मंगळवारी केली.पाटील यांच्याबाबत निर्णय न झाल्यास जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा, महामार्ग रोको व उपोषण करू, असा इशारा यावेळी देण्यात आला. याप्रश्नी  गुरुवारी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांची भेट घेण्यात येणार असल्याचे यावेळी नागरिकांनी सांगितले.पाटील यांच्यावर झालेल्या अन्यायासंदर्भात नगराध्यक्षा एम. आर. माळी यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने करवीर पोलीस उपअधीक्षक सूरज गुरव यांची पोलीस अधीक्षक कार्यालयात भेट घेतली. यावेळी पोलीस उपअधीक्षक (गृह) सतीश माने उपस्थित होते.औदुंबर पाटील यांनी कागल शहराला शिस्त लावण्याचे काम केले आहे. मुली-महिला सुरक्षा आणि अतिक्रमण, पार्किंगचा प्रश्न मिटविला आहे. त्यामुळे आता कुठे शहराला शिस्त लागत असताना त्यांची अचानक पोलीस मुख्यालयात बदली झाली. ती अन्यायकारक आहे. कागल नगरपरिषद इमारतीच्या जळीत दुर्घटनेचा तपास हा अंतिम टप्प्यात आला आहे. त्यातील आरोपीसुद्धा सापडला आहे. असे असताना त्यांच्या बदलीमागे कोण आहे, याचा शोध पोलिसांनी घ्यावा.यावेळी जिल्हा बँकेचे संचालक भैया माने म्हणाले, पाटील यांचे काम चांगले आहे. त्यामुळे त्यांना पूर्ववत कागलला आणावे. जिल्हा परिषदेचे सदस्य युवराज पाटील यांनी, अशा धाडसी अधिकाऱ्याची कागलला गरज आहे. त्यांना पुन्हा या ठिकाणी रुजू न केल्यास या प्रश्नी उग्र आंदोलन उभारू, असे सांगितले.यावेळी उपनगराध्यक्ष प्रवीण काळभोर, पंचायत समितीचे उपसभापती रमेश तोडकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती कृष्णात पाटील, चंद्रकांत गवळी, प्रकाश गाडेकर, आदींनी मते व्यक्त केली. शिष्टमंडळात प्रकाश कांबळे (बेलवळे बुद्रुक), नीता मगदूम, राजश्री माने, किरण कुलकर्णी, प्रमोद पाटील, संजय फराकटे, पद्मजा भालबर, शामराव सुदर्शनी, आदींचा सहभाग होता. 

औदुंबर पाटील यांना तांत्रिक कारणामुळे पोलीस मुख्यालयात आणण्यात आले आहे. त्यांची बदली झालेली नाही.- सूरज गुरव,पोलीस उपअधीक्षक, करवीर.

 

 

 

टॅग्स :Policeपोलिसkolhapurकोल्हापूर