शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : चिल्लर पार्टी, इला फौंडेशनच्या घुबड वाचवा मोहिमेला प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 16:44 IST

चिल्लर पार्टी विद्यार्थी चित्रपट चळवळीमार्फत इला फौन्डेशनच्या सहकार्याने सुरु केलेल्या घुबड वाचवा मोहिमेस जिल्ह्यातील विविध शाळांमधून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील २५ शाळांमधून या मोहिमेअंतर्गत घुबडांविषयी जनजागृती करणाऱ्या स्लाईड शो दाखविण्यात आले.

ठळक मुद्देचिल्लर पार्टी, इला फौंडेशनच्या घुबड वाचवा मोहिमेला प्रतिसाद२५ शाळांमधून मोहिमेअंतर्गत घुबडांविषयी जनजागृती

कोल्हापूर : चिल्लर पार्टी विद्यार्थी चित्रपट चळवळीमार्फत इला फौन्डेशनच्या सहकार्याने सुरु केलेल्या घुबड वाचवा मोहिमेस जिल्ह्यातील विविध शाळांमधून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील २५ शाळांमधून या मोहिमेअंतर्गत घुबडांविषयी जनजागृती करणाऱ्या स्लाईड शो दाखविण्यात आले.

केर्ली ता. करवीर येथील केर्ली माध्यमिक विद्यालय येथे शनिवारी घुबड वाचवा मोहिमेअंतर्गत स्लाईड शो दाखविण्यात आला. चिल्लर पार्टी विद्यार्थी चित्रपट चळवळीचे कार्यकर्ते अभियंता मिलिंद नाईक यांनी स्लाईड शोमधील घुबडांविषयी माहिती दिली.

यावेळी चिल्लर पार्टी विद्यार्थी चित्रपट चळवळीच्या विविध उपक्रमांचीही माहिती देण्यात आली. या कार्यक्रमास संस्थेचे सचिव मोहन पाटील, मुख्याध्यापक अरुण भोसले, आर. वाय. पाटील, आर्किटेक्ट सुधीर राऊत आदी उपस्थित होते. या शाळेतील ४०० विद्यार्थी-विद्यार्थीनी या कार्यक्रमासाठी उपस्थित होत्या.

कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी, करवीर तालुक्यातील विविध शाळांमधून या घुबड वाचवा मोहिमेस चांगला प्रतिसाद मिळत आहे. कोल्हापूर शहरातील वि. स. खांडेकर, तात्यासाहेब मोहिते, शिवाजी मराठी हायस्कूल, दादासाहेब मगदूम हायस्कूल, विकास विद्यामंदिर, जीवन कल्याण प्राथमिक विद्यालय, न्यू इंग्लिश स्कूल, अण्णासो शिंदे, साने गुरुजी वसाहत येथील गोविंद पानसरे विद्यालय, उषाराजे हायस्कूल, न्यू माध्यमिक विद्यालय आदी शाळेत स्लाईड शो दाखविण्यात आले.चिल्लर पार्टी विद्यार्थी चित्रपट चळवळीचे मिलिंद यादव, मोहिमेच्या समन्यवयक शिवप्रभा लाड, पद्मजा दवे, अभय बकरे, सुधाकर सावंत, मिलिंद नाईक, उदय संकपाळ, गुलाबराव देशमुख आदी या मोहिमेत सहभागी झाले आहेत.

 

 

टॅग्स :wildlifeवन्यजीवkolhapurकोल्हापूर