शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर :  सर्किट बेंच जागेचा अहवाल सोमवारपर्यंत देणार, निवासी उपजिल्हाधिकारी यांचे आश्वासन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2018 18:19 IST

सर्किट बेंच प्रश्नी शेंडा पार्क येथील ७५एकर जागेबाबत १३ विविध सरकारी कार्यालयाचा अभिप्राय मागवून त्याचा परिपूर्ण अहवाल पुणे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांना येत्या सोमवार (दि. ३०) पर्यंत देऊ, असे आश्वासन निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी सोमवारी दिले.

ठळक मुद्देसर्किट बेंच जागेचा अहवाल सोमवारपर्यंत देणारनिवासी उपजिल्हाधिकारी यांचे आश्वासन  शेंडा पार्कातील ७५ एकर जागेचा प्रस्ताव

कोल्हापूर : सर्किट बेंच प्रश्नी शेंडा पार्क येथील ७५ एकर जागेबाबत १३ विविध सरकारी कार्यालयाचा अभिप्राय मागवून त्याचा परिपूर्ण अहवाल पुणे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांना येत्या सोमवार (दि. ३०) पर्यंत देऊ, असे आश्वासन निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी सोमवारी दिले.सर्किट बेंचसाठी दिलेल्या जागेची वस्तुस्थिती काय आहे, हे जाणून घेण्यासाठी कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रशांत चिटणीस, जिल्हा सरकारी वकील अ‍ॅड. विवेक शुक्ल यांनी शिंदे यांच्याबरोबर जिल्हाधिकारी कार्यालयात चर्चा केली.यावेळी अ‍ॅड. चिटणीस म्हणाले, मुंबई उच्च न्यायालयाचे कोल्हापुरात सहा जिल्ह्याचे सर्किट बेंच व्हावे, यासाठी शासनाकडे शेंडा पार्कातील ७५ एकर जागेची मागणी बार असोसिएशनने केली आहे. याबाबत महापालिकेने दोन वर्षांपूर्वी ठराव केला आहे.

गेल्या आठवड्यात पुणे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांची भेट घेऊन निवेदन दिले होते. त्यांनी शेंडा पार्क (ता. करवीर) येथील (रि. स. नं. ५८९ ते ७०९) येथील जागेच्या प्रस्तावात त्रुटी काढल्या आहेत. या त्रुटींची जिल्हा प्रशासनाने तातडीने पूर्तता करून द्यावी.बैठकीस बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष अ‍ॅड. महादेवराव आडगुळे, विद्यमान उपाध्यक्ष अ‍ॅड. आनंदराव जाधव, सेक्रेटरी अ‍ॅड. सुशांत गुडाळकर, अ‍ॅड. विवेक घाटगे, अ‍ॅड. प्रकाश मोरे, माजी महापौर आर. के. पोवार, बाबा पार्टे यांच्यासह करवीर प्रांताधिकारी सचिन इथापे, आरोग्य, वन, भूमी अभिलेख, आदी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

सर्किट बेंच प्रश्नी सध्या सहा जिल्ह्यांतील वकिलांच्या गाठी-भेटी सुरू आहेत. तसेच शेंडा पार्कातील जागेबाबत आम्ही सकारात्मक आहोत. त्यावर निर्णय काय होतो? त्यावर या प्रश्नी पुढील दिशा ठरविणार आहोत.-अ‍ॅड. प्रशांत चिटणीस, अध्यक्ष कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशन.

 

टॅग्स :Courtन्यायालयkolhapurकोल्हापूरcollectorजिल्हाधिकारी