शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायल-हमास शांतता करार: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा दोघांचीही सही मिळविली, युद्ध थांबणार?
2
आजचे राशीभविष्य-९ ऑक्टोबर २०२५: आनंदोत्सव साजरा करण्याचा दिवस; व्यवसाय-नोकरीत होईल लाभ!
3
दोन शिवसेनेतल्या सततच्या भांडणांचा फायदा कोणाला?
4
संपादकीय: दिलासा तूर्त, चिंता शाश्वत! कर्जमाफीचा उच्चार न करता दिलेले पॅकेज...
5
पाकवर हल्ला कोणाच्या सांगण्यामुळे राेखला? पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचा काॅंग्रेसला सवाल
6
उद्योगांवर विजेचा ‘गुपचुप’ हल्ला, राज्यात स्थिती आणखी बिकट; प्रति युनिट दर ११.१५ रुपयांवर 
7
वाहनचालकांनो सावधान! विना हेल्मेट, राँग साइड, प्रखर दिव्यांविरुद्ध कठोर कारवाई करा : सुप्रीम कोर्ट
8
इलेक्ट्रिक कार विक्रीत दुप्पट वाढ; सप्टेंबरमध्ये नवा विक्रम; १५ हजार इव्हींची विक्री
9
‘६० कोटी जमा करा, मग याचिकेवर विचार’; शिल्पा शेट्टीवर न्यायालय संतापले...
10
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाण कुणाचा? १२ नोव्हेंबरला सुनावणी   
11
भाजपकडून लोकप्रिय चेहऱ्यांना संधी; गायिका मैथिलीस पक्षाची उमेदवारी? डॅमेज कंट्रोल मोड ऑन
12
एक जीबी डेटा आता चहाच्या एका कपापेक्षाही स्वस्त झाला आहे : मोदी
13
आता स्मार्ट चष्म्याने पाहा, बोला अन् पैसे द्या; फोनशिवाय अन् पिन न टाकता करता येणार व्यवहार 
14
प्रा. कितागावा, रॉबसन अन् याघी यांना नोबेल; मेटल-ऑर्गेनिक फ्रेमवर्कसाठी रसायनशास्त्रातील पुरस्कार 
15
भारताशी युद्ध झाल्यास आम्हीच बाजी मारणार; पाकचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची दर्पोक्ती
16
महिला विश्वचषक : ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला दिला धडा, मूनीचे निर्णायक शतक
17
जब गिल पर आया दिल, तो रोहित क्या चीज हैं !
18
महिला विश्वचषक : फलंदाजांना दाखवावा लागेल दम, आज दक्षिण आफ्रिकेच्या कडव्या आव्हानाचा करणार सामना
19
न बोलता कृतीतून शिकवणाऱ्या ‘जीजीं’ची पाखर
20
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!

कोल्हापूरच्या संशोधकाने शोधल्या पाच नव्या पाली

By संदीप आडनाईक | Updated: December 9, 2022 19:04 IST

ठाकरे वाइल्ड लाइफ फाउंडेशनच्या तेजस ठाकरे आणि ईशान अगरवाल यांच्या सहकार्याने त्यांनी या दुर्मीळ पालींचा शोध लावला

संदीप आडनाईक कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातील प्राणिशास्त्र विभागातील संशोधक अक्षय खांडेकर यांनी तामिळनाडूमधील शेव्हरॉय या पर्वतरांगेतून पाच नव्या आश्चर्यकारक नवीन पालींच्या प्रजातींचा शोध लावला आहे. ठाकरे वाइल्ड लाइफ फाउंडेशनच्या तेजस ठाकरे आणि ईशान अगरवाल यांच्या सहकार्याने त्यांनी या दुर्मीळ पालींचा शोध लावला असून, त्यातील एका प्रजातीचे नाव सलीम अली यांच्या सन्मानार्थ ठेवले आहे तर इतर प्रजातींचे त्यांच्या प्रकारानुसार आणि प्रजातींच्या वैशिष्ट्यांसाठी नामकरण केले आहे.या तिघांनी यापूर्वीही याच राज्यातून तीन नव्या पालींचा शोध लावला होता. जर्मनीमधून प्रकाशित होणाऱ्या ‘व्हर्टिब्रेट्स झूलॉजी’ या आंतरराष्ट्रीय संशोधन पत्रिकेत त्यांचा यासंबंधीतील शोधनिबंध बुधवारी प्रकाशित झाला.

  • ''निमाॅस्पीस सलिमअली'' या प्रजातीचे नामकरण डॉ. सलीम अली यांच्या भारतातील पक्षी संशोधनामध्ये केलेल्या अतुलनीय कार्यासाठी केले आहे. ही प्रजाती कोल्ली पर्वताच्या ११०० मी.च्या वरती आढळते.
  • ''निमाॅस्पीस रुधिरा'' येरकाड पर्वतावरती आढळते. तिच्या वैशिष्ट्यपूर्ण रंगावरून तिचे नामकरण रुधिरा (रक्त) असे केले आहे.
  • ''निमाॅस्पीस आगाईगंगा'' ही प्रजाती कोल्ली पर्वताच्या पूर्वेकडील उताराच्या मध्यउंचीवर आढळून येते. आगाईगंगा धबधब्याजवळ प्रथम आढळली म्हणून तिचे हे नामकरण केले आहे.
  • ''निमाॅस्पीस फंटास्टिका'' ही प्रजाती कोल्ली पर्वताच्या पश्चिम उताराच्या मध्यउंचीवर आढळून येते. वैशिष्ट्यपूर्ण रंगयोजनेवरून तिचे नामकरण फंटास्टिका या ग्रीक शब्दाने केले आहे, जे नेत्रदीपक रंगाचे संकेत देते.
  • ''निमाॅस्पीस पचमलाएनसीस'' या प्रजातीचे नामकरण पचमलाई या पर्वतावरून केले आहे. या प्रजाती ३० ते ३५ मिलीमीटर लांबीच्या आहेत. नराचे रंग भडक असतात तर माद्या या रंगाने फिकट असतात. या पाली मुख्यत्वे दगडांवरती आढळतात आणि दिवसा सक्रिय असतात. छोटे किडे आणि मुंग्या हे त्यांचे मुख्य खाद्य आहे.

 

जगभरात पालींच्या १५० हून अधिक प्रजाती आढळून येतात. आत्तापर्यंत निमाॅस्पीस प्रजातीच्या ७० हून अधिक प्रजातींची नोंद होती, त्यात या पाच प्रजातींची भर पडली आहे. निमास्पिस हा भारतातील पृष्ठवंशीय प्राण्यांमधे सर्वाधीक प्रजाती असणारा जीनस आहे. -अक्षय खांडेकर, संशोधक. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूर