शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : बलात्काऱ्यांना पक्षातून काढून टाका, ‘हिंदी है हम, हिंदोस्ता हमारा’ची पंतप्रधानांना पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2018 11:22 IST

उन्नाव प्रकरणामध्ये भाजपच्या आमदारावर बलात्काराचा आरोप आहे, कथुवा प्रकरणामध्ये भाजपचे मंत्री तिरंगा घेऊन मोर्चामध्ये सहभागी आहेत. त्यांना तातडीने पक्षातून काढून टाकण्याची मागणी येथील ‘हिंदी है हम, हिंदोस्ता हमारा’ संघटनेच्यावतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे बलात्काऱ्यांना पक्षातून काढून टाका‘हिंदी है हम, हिंदोस्ता हमारा’ची पंतप्रधानांना पत्र

कोल्हापूर : उन्नाव प्रकरणामध्ये भाजपच्या आमदारावर बलात्काराचा आरोप आहे, कथुवा प्रकरणामध्ये भाजपचे मंत्री तिरंगा घेऊन मोर्चामध्ये सहभागी आहेत. त्यांना तातडीने पक्षातून काढून टाकण्याची मागणी येथील ‘हिंदी है हम, हिंदोस्ता हमारा’ संघटनेच्यावतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे करण्यात आली आहे.

बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून हे मागणीचे निवेदन देण्यात आले. मोर्चेकऱ्यांच्या हातातील विविध फलकांनी नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. दसरा चौकातून रणरणत्या उन्हात महिला आणि कार्यकर्त्यांचा समावेश असलेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला.

उन्नाव आणि कथुवा या दोन्ही प्रकरणांमध्ये पोलिसांचा सहभाग आहे. या भ्रष्ट पोलिसांमुळे अत्याचार करणाऱ्यांना बळ मिळते. आरोपी सहीसलामत सुटतात. त्यामुळे तपासात दुर्लक्ष करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करावी, सहा महिन्यांत न्याय देण्यासाठी जलद कृती न्यायालयाची स्थापना करावी, गुन्हेगारांना शिक्षाच व्हावी यासाठी प्रक्रियेमध्ये सुधारणा करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.‘खून का बदला खून’ हा प्रकार लोकशाहीमध्ये योग्य नाही, तेव्हा खून आणि बलात्काराला फाशीच्या शिक्षेचा फेरविचार व्हावा, मुलींना शालेयस्तरावर मोफत आत्मसंरक्षणाचे शिक्षण द्यावे, लैंगिक प्रबोधन करावे, अशाही मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत.

नायब तहसीलदार डॉ. अपर्णा मोरे-धुमाळ यांना निवेदन देण्यात आले. संघटनेचे कार्यकारी अध्यक्ष हुमायुन मुरसल यांच्या नेतृत्वाखाली यास्मिन देसाई, शहनाज नदाफ, तनवीर बागवान, मुनेर शिकलगार, फरजाना शेख, समीर बागवान, इम्तियाज नदाफ, मुसा शेख, शौकत मुजावर, मुन्ना पठाण, मेहबूब बोजगर, बशीर पठाण, राजू शेख, सिकंदर शेख यांच्यासह अनेक कार्यकर्ते मोर्चामध्ये सहभागी झाले होते. 

 

टॅग्स :Kathua Rape Caseकठुआ बलात्कार प्रकरणkolhapurकोल्हापूर