शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : किरणोत्सवातील अडथळे हटविले, निषेधानंतर महापालिकेचे पाऊल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2018 12:30 IST

श्री अंबाबाईच्या किरणोत्सवातील अडथळ्यांवर आयोजित बैठक फिस्कटल्यानंतर महापालिकेने मंगळवारी तातडीने याबाबत पाऊल उचलत किरणोत्सव मार्गातील सात इमारतींचा अडथळा दूर केला. सोमवारी (दि. ५) देवस्थानसह पदाधिकाऱ्यांनी केलेला निषेध गांभीर्याने घेत सुट्टीच्या दिवशी ही कारवाई करण्यात आली.

ठळक मुद्देकिरणोत्सवातील अडथळे हटविलेनिषेधानंतर महापालिकेचे पाऊल

कोल्हापूर : श्री अंबाबाईच्या किरणोत्सवातील अडथळ्यांवर आयोजित बैठक फिस्कटल्यानंतर महापालिकेने मंगळवारी तातडीने याबाबत पाऊल उचलत किरणोत्सव मार्गातील सात इमारतींचा अडथळा दूर केला. सोमवारी (दि. ५) देवस्थानसह पदाधिकाऱ्यांनी केलेला निषेध गांभीर्याने घेत सुट्टीच्या दिवशी ही कारवाई करण्यात आली.श्री अंबाबाईचा किरणोत्सव उद्या, गुरुवारपासून सुरू होत आहे. किरणोत्सवातील अडथळ्यांवर चर्चा व तोडगा काढण्यासाठी सोमवारी सायंकाळी आयुक्तांच्या दालनात आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांच्यासमवेत देवस्थान समितीचे पदाधिकारी तसेच मिळकतदारांची बैठक आयोजित करण्यात आली होती.

मात्र दिलेल्या वेळेनंतर अर्धा तास झाला तरी आयुक्तांनी बैठक न घेतल्याने समितीचे अध्यक्ष महेश जाधव, अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाचे उपाध्यक्ष संजय पवार, शिवसेना जिल्हाप्रमुख यांच्यासह पदाधिकारी संतप्त झाले व आयुक्तांचा निषेध करून महापालिकेतून निघून गेले. तसेच आयुक्तांना किरणोत्सवाचे गांभीर्य नाही, त्यांना हा प्रश्नच सोडवायचा नाही, असा त्यांनी आरोप केला.या गोष्टीची गांभीर्याने दखल घेत आयुक्तांच्या सूचनेनुसार मंगळवारी महापालिकेचे शहर अभियंता कार्यालय व अतिक्रमण विभागाने किरणोत्सव मार्गातील अडथळे हटविण्यास सुरुवात केली. दिवसभरात आगळगावकर, देशिंगे अशा जवळपास सात मिळकतदारांच्या इमारतींचे अडथळे बऱ्याच प्रमाणात काढण्यात आले. त्यामुळे यंदाचा किरणोत्सव पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. मात्र सध्या थंडी नसली तरी सूर्यास्त लवकर होत आहे.

ढगाळ वातावरण व धुक्याचाही किरणोत्सवावर परिणाम होण्याची शक्यता आहे. यावेळी शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, देवस्थान समितीचे अभियंता सुदेश देशपांडे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. 

 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर