शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : पाटगाव धरणग्रस्तांचे रखडलेले पुनर्वसन मार्गी लावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2018 14:21 IST

पाटगाव धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अजून भिजत पडला असून तो तत्काळ मार्गी लावावा, या मागणीचे निवेदन शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने मंगळवारी अतिरिक्त जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर यांना देण्यात आले.

ठळक मुद्देपाटगाव धरणग्रस्तांचे रखडलेले पुनर्वसन मार्गी लावाशेतकरी कामगार पक्षाची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

कोल्हापूर : पाटगाव धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अजून भिजत पडला असून तो तत्काळ मार्गी लावावा, या मागणीचे निवेदन शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने अतिरिक्त जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर यांना देण्यात आले.महाराष्ट्र सुजलाम्-सुफलाम् होण्यासाठी शासनाने मोठमोठे प्रकल्प बांधले. या धरणाच्या पाण्यावर अनेकांचे जीवनमान उंचावले; पण ज्यांनी या धरणासाठी जमिनी दिल्या, त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.

घरेदारे, जमिनींचा त्याग करून दुसऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास हातभार लावणाऱ्यांची अवस्था फार बिकट झाली असून, त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न तत्काळ निकालात काढा, अशी मागणी ‘शेकाप’चे बाबूराव कदम यांनी केली.

यावेळी मधुकर हरेल, सुशांत बोरगे, प्रकाश कदम, सुरेश वास्कर, अनंत वास्कर, संतोष परब, भीमराव वास्कर, दिगंबर वास्कर, विठ्ठल कांबळे, आदी उपस्थित होते.

या केल्या मागण्या :

  1. शासकीय, निमशासकीय, सहकारी संस्थांच्या नोकºयांमध्ये पाच टक्के आरक्षण द्यावे.
  2. धरणाची उंची वाढल्यामुळे घरे, गोठ्यांचे नुकसान झाले. त्यांच्या नुकसान भरपाईचे पैसे तातडीने द्यावेत.
  3. देय जमिनी देऊन त्यांचे पुनर्वसन करावे.
  4. प्रकल्पग्रस्तांना पक्के दाखले तत्काळ मिळाले पाहिजेत.
  5. घरांसाठी प्लॉट द्यावेत. सरकारने ठरल्याप्रमाणे घरबांधणीसाठी दीड लाख रुपये द्यावेत.
  6. धरणग्रस्तांच्या मुलांना शिक्षणामध्ये समांतर आरक्षण मिळालेच पाहिजे.

ज्या प्रकल्पग्रस्तांना नोकरी मिळणार नाही, त्यांना शासनाच्या धोरणाप्रमाणे पाच लाख रुपये अनुदान देण्यात यावे.

 

 

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीkolhapurकोल्हापूर