शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus Lockdown : दहावीचा भूगोल विषयाचा पेपर रद्द; संभ्रमावस्था संपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2020 16:47 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने भूगोल विषयाचा पेपर रद्द करण्याचा निर्णय रविवारी घेतला. त्याचा कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांतील सुमारे पावणेदोन लाख विद्यार्थ्यांना लाभ होणार आहे. या निर्णयामुळे संबंधित विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांची या पेपरबाबतची संभ्रमावस्था संपली आहे.

ठळक मुद्देदहावीचा भूगोल विषयाचा पेपर रद्द; संभ्रमावस्था संपलीकोल्हापूर विभागातील पावणेदोन लाख विद्यार्थ्यांना होणार लाभ

कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने भूगोल विषयाचा पेपर रद्द करण्याचा निर्णय रविवारी घेतला. त्याचा कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांतील सुमारे पावणेदोन लाख विद्यार्थ्यांना लाभ होणार आहे. या निर्णयामुळे संबंधित विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांची या पेपरबाबतची संभ्रमावस्था संपली आहे.दहावीचे पेपर होतील तसे ते तपासणीसाठी शिक्षकांकडे शाळांच्या माध्यमातून पाठविण्यात आले. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील ‘लॉकडाऊन’मुळे उत्तरपत्रिका तपासणीचे काम ठप्प झाले आहे. बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीचे काम बहुतांश प्रमाणात पूर्ण झाले आहे.

या उत्तरपत्रिका संकलनाची प्रक्रिया विभागीय मंडळाने दि. १८ मार्चपासून सुरू केली. त्यानंतर दोन दिवस ही प्रक्रिया सुरू राहिली. त्यानंतर लॉकडाऊनमुळे ही प्रक्रिया देखील थांबली. लॉकडाऊन संपल्यानंतर उत्तरपत्रिका तपासणी आणि निकाल तयार करण्याबाबतची कार्यवाही सुरू केली जाईल. राज्य शासनाच्या आदेशानुसार या विषयाच्या मूल्यांकनाबाबतची कार्यवाही केली जाईल, असे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे कोल्हापूर विभागीय सचिव सुरेश आवारी यांनी सांगितले.

दरम्यान, भाषा, गणित आणि विज्ञान विषयाच्या आधारे दहावीचा निकाल जाहीर करा, अशी मागणी कोल्हापूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाने केली आहे. त्याबाबतचे निवेदन संघाने शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना दिले.

कोरोनाची स्थिती लक्षात घेऊन पेपर रद्दचा सरकारने घेतलेला निर्णय योग्य आहे. या पेपरचे मूल्यांकन करताना स्कॉलर, अभ्यासू विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही याची सरकारने दक्षता घ्यावी.- क्रांतिकुमार वरक, विद्यार्थी

आम्हा विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने शासनाने चांगला निर्णय घेतला आहे. गेल्या १५ हून अधिक दिवसांपासून पेपरबाबत आमच्या मनात असलेली संभ्रमावस्था दूर झाली आहे.-श्वेता पिसे, विद्यार्थिनी 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याssc examदहावीkolhapurकोल्हापूर