शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
3
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
4
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
5
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
6
Opening Bell: अमेरिकन जॉब डेटाच्या आकडेवारीमुळे बाजारात तेजी; Bajaj Financeच्या शेअरमध्ये वाढ, पॉवर ग्रिड घसरला
7
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
8
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
9
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
10
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
11
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
12
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
13
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
14
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
15
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
16
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
17
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
18
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
19
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
20
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी

कोल्हापूर : पेट्रोल-डिझेल व गॅसचे दर कमी करा, भाकपचे निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 5:04 PM

केंद्र सरकारने पेट्रोल डिझेल व गॅसचे दर कमी करावेत, महागाई कमी करावी या मागणीचे निवेदन बुधवारी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांना देण्यात आले.

ठळक मुद्देपेट्रोल-डिझेल व गॅसचे दर कमी कराभाकपचे निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

कोल्हापूर : गेल्या चार वर्षांपासून सत्तेत असलेल्या भाजपने ‘अच्छे नव्हे तर बुरे दिन’ आणले आहेत. महागाईचा आगडोंब उसळलेला असताना पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या दरात प्रचंड वाढ करून जनतेला वेठीस धरले आहे तरी केंद्र सरकारने पेट्रोल डिझेल व गॅसचे दर कमी करावेत, महागाई कमी करावी या मागणीचे निवेदन बुधवारी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांना देण्यात आले.निवेदनात म्हटले आहे की, महागाईमुळे देशात गेल्या वर्षभरात ११ हजार ४०० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. दुसरीकडे भारतातील अब्जाधीशांची यादी वाढतच चालली आहे.

सरकारने टॅक्स वाढवून सरकारी तिजोऱ्या भरल्या, गेल्यावर्षीपासून आंतरराष्ट्रीय दरानुसार पेट्रोल-डिझेलचे दर बदलतील, असा फतवा काढला तेव्हापासून पेट्रोलचा दर ६५ रुपयांवरून ८४ रुपयांवर डिझेलचे दर ५४ रुपयांवरून ७१ रुपयांवर आले आहेत.

अशारितीने जनतेवर ‘स्लो पॉयझनिंग’ केले जात आहे. याउलट इराणमध्ये २४.४९ रुपये, पाकिस्तानमध्ये ५१.६१ रुपये, श्रीलंकेत ६३.७७ व बांगलादेशात ७१.६९ रुपये इतका पेट्रोलचा दर आहे.इंधन दरवाढ नियंत्रित करण्याऐवजी वित्तमंत्री अरुण जेटली यांनी ‘जनता प्रामाणिकपणे टॅक्स भरत नसल्याने महागाई वाढल्याचे’ बेजबाबदार विधान केले आहे. अशा या दिवाळखोर सरकारच्या मदतीसाठी आम्ही १२ पैशांचा धनादेश पंतप्रधान सहाय्यता निधीला प्रदान करतो व त्यांनी महागाई कमी करावी.

जीवनावश्यक वस्तूंचे दर संसदेच्या कँटिनमधील दराप्रमाणे कमी करावेत. यावेळी सतीशचंद्र कांबळे रघुनाथ कांबळे, सुमन पाटील, मीना चव्हाण, दिलदार मुजावर, अल्फान वडगावे, स्नेहल कांबळे, शुभांगी पाटील, मारुती आजगेकर, नामदेव पाटील, शिवाजी जाधव, रमेश वडणगेकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. 

 

टॅग्स :Petrolपेट्रोलkolhapurकोल्हापूर