शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : ‘गोकुळ’ची नोकरभरती अडकणार कायद्याच्या कचाट्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2018 11:57 IST

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघातील (गोकुळ) नोकरभरती कायद्याच्या कचाट्यात अडकणार आहे. भरतीबाबत उच्च न्यायालयाने दुग्धविकास मंत्री महादेव जानकर व दुग्धविकास विभागाकडे खुलासा मागितला आहे.

ठळक मुद्देउच्च न्यायालयाने मागितला दुग्धविकास विभागाकडे खुलासा : सरकारचा फायदा घेता, मग आरक्षणानुसार भरती का नाही

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघातील (गोकुळ) नोकरभरती कायद्याच्या कचाट्यात अडकणार आहे. भरतीबाबत उच्च न्यायालयाने दुग्धविकास मंत्री महादेव जानकर व दुग्धविकास विभागाकडे खुलासा मागितला आहे. सरकारचे अनुदान व इतर लाभ घेता, मग आरक्षणानुसार भरती प्रक्रिया का राबवली जात नाही, अशी तक्रार कॉँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी न्यायालयात केली आहे.‘गोकुळ’ च्या सत्तारूढ गटाने नोकरभरती करण्यासाठी विभागीय उपनिबंधक (दुग्ध) यांच्याकडे परवानगी मागितली होती. त्यांनी जानेवारी २०१८ मध्ये परवानगी दिली. या विरोधात आमदार सतेज पाटील यांनी संघाच्या आॅडिट रिपोर्टमधील ताशेरे निदर्शनास आणून देत भरतीला स्थगिती देण्याची मागणी दुग्धविकास मंत्री जानकर यांच्याकडे केली होती. त्यानुसार मंत्री जानकर यांनी २० जून २०१८ रोजी भरतीस स्थगिती दिली.

त्यानंतर मंत्री जानकर यांनी ३ जुलैला स्थगिती उठवली आणि ४ जुलै रोजी संचालकांनी जम्बो भरती केली. यावर आमदार पाटील यांनी हरकत घेत, तक्रारदाराचे म्हणणे न घेताच मंत्र्यांनी स्थगिती दिली कशी? अशी विचारणा करत विधानसभेत सरकारला धारेवर धरले. त्याच दिवशी मंत्र्यांनी दुसऱ्यांदा भरतीला स्थगिती दिली.

या संपूर्ण प्रक्रियेविरोधात आमदार पाटील यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. यावर मंगळवारी (दि. २८) सुनावणी झाली. यामध्ये आमदार पाटील यांचे वकील अ‍ॅड. अंतुरकर यांनी संपूर्ण भरती प्रक्रियाच चुकीची असून मंत्री जानकर यांनी यामध्ये घेतलेल्या भूमिकेबाबत संशय व्यक्त केला.

संघाचे नेते महादेवराव महाडिक यांचे सुपुत्र भाजपचे आमदार असल्याने त्यांच्या बाजूने मंत्री जानकर यांनी निर्णय दिल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. ‘गोकुळ’ ने आतापर्यंत कोट्यवधी रुपयांचे अनुदान सरकारकडून घेतले आहे, त्याचबरोबर जमिनीही घेतल्याने त्यांना भरतीची प्रक्रिया सरकारच्या नियमानुसारच करावी लागणार असल्याचे अ‍ॅड. अंतुरकर यांनी सांगितले. आमदार पाटील यांच्याकडून अ‍ॅड. अंतुरकर व अ‍ॅड. तानाजी म्हातुगडे तर ‘गोकुळ’ कडून अ‍ॅड. अमित बोरकर यांनी काम पाहिले.यावर, मंत्री जानकर व दुग्ध विकास संचालक यांच्याकडून न्यायालयाने खुलासा मागितला आहे. तीन आठवड्यात म्हणजे १८ सप्टेंबरला यावर सुनावणी होणार आहे. एकूणच ‘गोकुळ’ ने राबविलेली भरती प्रक्रिया कायद्याच्या कचाट्यात अडकण्याची शक्यता आहे. 

 

टॅग्स :Milk Supplyदूध पुरवठाkolhapurकोल्हापूर