शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

कोल्हापूर : महानगरपालिका पाणीपुरवठा विभागाच्यावतीने पाणी बिलाची आता जागेवरच वसुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 17:47 IST

कोल्हापूर महानगरपालिका पाणीपुरवठा विभागाच्यावतीने पाणीपट्टी आकारणी व वसुली प्रभावीपणे व पारदर्शकपणे राबविण्याच्या अनुषंगाने स्पॉट बिलिंगपाठोपाठ आता जागेवरच वसुली करण्याचा निर्णय घेण्यात आला असून काही भागात प्रायोगित तत्त्वावर त्याची सुरुवातही झाली आहे. येणाऱ्या अडचणी, अडथळे लक्षात घेऊन तसेच त्यात सुधारणा करून त्याचा संपूर्ण शहरभर अवलंब केला जाणार आहे.

ठळक मुद्देकोल्हापूर महापालिकेचा उपक्रमपाच भागात हा प्रकल्प प्रायोगिक तत्त्वावर स्पॉट बिलिंगपाठोपाठ आता जागेवरच वसुली

कोल्हापूर : महानगरपालिका पाणीपुरवठा विभागाच्यावतीने पाणीपट्टी आकारणी व वसुली प्रभावीपणे व पारदर्शकपणे राबविण्याच्या अनुषंगाने स्पॉट बिलिंगपाठोपाठ आता जागेवरच वसुली करण्याचा निर्णय घेण्यात आला असून काही भागात प्रायोगित तत्त्वावर त्याची सुरुवातही झाली आहे. येणाऱ्या अडचणी, अडथळे लक्षात घेऊन तसेच त्यात सुधारणा करून त्याचा संपूर्ण शहरभर अवलंब केला जाणार आहे.सध्या स्पॉट बिलिंग हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पांतर्गत सध्या ४४ मीटर रिडर्स यांना अँड्रॉईडबेस मोबाईल व ब्लूटूथ प्रिंटर उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. सदर मोबाईलद्वारे प्रत्यक्ष जागेवर पाणी मीटरचे छायाचित्र घेऊन पाणीपट्टी आकारणीचे छापील बिल संबंधित ग्राहकास त्वरित देण्यात येत आहेत.

सदरची बिले नजीकच्या नागरी सुविधा केंद्रामध्ये भरणा करून घेण्यात येत आहेत. तथापि, नागरिकांच्या सोयीसाठी पाणी बिलाची रक्कम जागेवरच स्वीकारण्याची सुविधा सुरू करण्यात येत असून सध्या शहराच्या काही भागांत प्रायोगिक तत्त्वावर पाणी बिलाची रक्कम स्वीकारण्यासाठी मीटर रिडर यांचे मोबाईलवर ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

गांधी मैदान वॉर्ड कार्यालयाकडील बाबासाहेब निकम (ए व बी वॉर्ड) शिवाजी मार्केट वॉर्ड कार्यालयाकडील प्रथमेश माजगांवकर (सी व डी वॉर्ड) राजारामपुरी वॉर्ड कार्यालयाकडील तुषार पोवार (ई व बी वॉर्ड) कावळा नाका वॉर्ड कार्यालयाकडील किरण सणगर व नरेंद्र पराते (ई वॉर्ड) यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.नागरिकांनी संबंधित मीटर रिडर आपलेकडे पाणीपट्टी बिलाची रक्कम स्वीकारण्यास आल्यास त्यांचेकडे पाणी बिलाची रक्कम देऊन रितसर पोहोच पावती घेणेची आहे. या पाच भागात हा प्रकल्प प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येत असून लवकरच संपूर्ण शहरात याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे, असे पाणीपुरवठा विभागाने म्हटले

टॅग्स :kolhapurकोल्हापूरWaterपाणीMuncipal Corporationनगर पालिका