शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
2
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
3
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
4
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
5
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला
6
सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'?
7
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
8
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
9
बाबांसोबत खेळणाऱ्या 'या' चिमुरड्याला ओळखलंत का? आज करतोय क्रिकेटविश्वावर राज्य
10
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
11
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
12
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
13
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!
14
सोमनाथसोबत खरंच लग्न केलं? अखेर राजेश्वरी खरातचा मोठा खुलासा, म्हणाली- "लवकरच मी गुड न्यूज.."
15
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
16
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
17
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
18
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
19
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!

कोल्हापूर : पहिली मुलगी झाल्याच्या कारणातून विवाहितेचा छळ, पतीसह सातजणांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2018 11:26 IST

कोल्हापूर : पहिली मुलगी झाल्याच्या कारणातून विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी पतीसह सातजणांवर करवीर पोलीस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा ...

ठळक मुद्देविवाहितेचा छळ, पतीसह सातजणांवर गुन्हापहिली मुलगी झाल्याचे कारण

कोल्हापूर : पहिली मुलगी झाल्याच्या कारणातून विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी पतीसह सातजणांवर करवीर पोलीस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला. संशयित पती अशोक आनंदराव यादव, सासू मालती आनंदराव यादव, सासरे आनंदराव गणपती यादव (तिघे रा. बालिंगा, ता. करवीर), नणंद अरुणा उमेश पाटील, तिचा पती उमेश बाबूराव पाटील, सविता विवेक चव्हाण, तिचा पती विवेक वसंत चव्हाण (सर्व रा. साने गुरुजी वसाहत, कोल्हापूर) अशी त्यांची नावे आहेत.अधिक माहिती अशी, विवाहिता पूनम अशोक यादव (रा. बालिंगा) यांचा विवाह आठ वर्षांपूर्वी झाला. त्यांचे पती अशोक यादव हे कोल्हापुरातील एका खासगी संस्थेत कॅशिअर आहेत. विवाह झाल्यानंतर दोन वर्षांनी त्यांना मुलगी झाली. त्यामुळे पतीसह सासू-सासरे, नणंद व त्यांच्या पतींनी तिला खिजविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर सर्वजण संगनमत करून तिचा मानसिक व शारीरिक छळ करू लागले.

चारित्र्यावर संशय घेत अंगावरील दागिने जबरदस्तीने काढून त्यांनी तिला माहेरी पाठविले. यावेळी दोन्ही मुलेही सासरी ठेवून घेतली. त्यांना भेटूही दिले जात नाही. या मानसिक तणावाखाली पूनम यांची प्रकृती अत्यवस्थ झाल्याने माहेरच्या कुटुंबीयांनी त्यांना राजारामपुरी येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले.

यावेळी येथील डॉक्टरांसह नातेवाइकांनी अशोक यादव यांना ‘पूनमची प्रकृती जास्तच खालावली आहे. तुम्ही रुग्णालयात या,’ असा निरोप देऊनही सासरचे लोक तिकडे फिरकले नाहीत. त्यानंतर त्यांनी वकिलांमार्फत नोटीस पाठवून घटस्फोटासाठी तगादा लावला आहे.

पूनमच्या माहेरची परिस्थिती अत्यंत गरिबीची आहे. रोजच्या त्रासाला कंटाळून त्यांनी सासरच्या लोकांविरोधात पोलिसांत फिर्याद दिली. या प्रकरणी सहायक फौजदार भगवान गिरिगोसावी अधिक तपास करीत आहेत.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर