शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : राज ठाकरे अन् उद्धव ठाकरे एकत्र येणार का? संजय राऊतांनी सगळंच सांगितलं
2
“राहुल गांधींचा ‘डरो मत’ संदेश अमलात आणू, एकता, अखंडतेची मशाल घेऊन वाटचाल करू”: सपकाळ
3
Video - अग्निकल्लोळ! एका ठिणगीमुळे बोटीला भीषण आग; १४८ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
“इथले मीठ खाता अन् मराठीला विरोध करता? हिंदीची सक्ती होऊ देणार नाही”; उद्धव ठाकरेंनी ठणकावले
5
“कार्यकर्त्यांनी कठोर मेहनत घ्यावी, ५ वर्षांनंतर काँग्रेस पुन्हा सत्तेत येईल”: नाना पटोले
6
"मी ज्या झोपडपट्टीतून आलोय...", दिसण्यावरून ट्रोल करणाऱ्यांना सिद्धार्थ जाधवची सणसणीत चपराक
7
गुजरातविरुद्ध केएल राहुलचा विक्रमी षटकार; रोहित, विराट आणि धोनीच्या पंक्तीत झाला सामील
8
'तो' प्रवास ठरला शेवटचा! गायीला वाचवण्याच्या प्रयत्नात कार कालव्यात पडली, एअर होस्टेसचा मृत्यू
9
'हिंदू आहोत हा आमचा गुन्हा आहे का?', पश्चिम बंगाल हिंसाचार बाधित महिलांचा भावनिक सवाल
10
Vastu Tips: पायपुसण्याखाली ठेवा कापराच्या दोन वड्या, होतील चमत्कारिक फायदे!
11
“आम्ही कुटुंब फोडणारे नाही, राज अन् उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर स्वागतच”: हर्षवर्धन सपकाळ
12
"किती दिवस स्वप्नीलसाठी फक्त टाळ्या वाजवायच्या?"; सोनाली कुलकर्णीचं वक्तव्य चर्चेत
13
दुहेरी हत्याकांडाने छत्रपती संभाजीनगर हादरलं; दुचाकीच्या वादातून दोघांची दगडाने ठेचून हत्या
14
संतापजनक! ज्ञानाच्या मंदिरात शिक्षकानं विद्यार्थ्यांना पाजली दारू, पाहा व्हिडिओ
15
‘२.५ कोटी रुपये पगार असावा आणि...!’ भावी नवऱ्याकडून तरुणीच्या अपेक्षांची मोठी लिस्ट, व्हायरल पोस्ट चर्चेत
16
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांना गती; शिंदे गटातील नेत्यांची प्रतिक्रिया म्हणाले...
17
“...म्हणून त्यांनी माझे सरकार पाडले”; उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले, सांगितली Inside Story
18
हे साफ खोटं, ही FAKE NEWS आहे...; 'डिंपल गर्ल' प्रिती झिंटा असं का म्हणाली? प्रकरण काय
19
Astro Tips: 'या' उपायामुळे सोमवार २१ एप्रिलचा दिवस तुमच्या आयुष्यात संस्मरणीय ठरू शकतो!
20
३ तास समजावल्यानंतरही, सासूचे मत बदलले नाही, होणाऱ्या जावयाकडेच राहणार; मुलीच्या लग्नाआधी झाली होती फरार

कोल्हापूर : कठीण काळात तग धरुण राहण्यातच खरी कसोटी : किशोर कदम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2018 17:02 IST

 कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृहात कॉ. संतराम पाटील श्रमिक चॅरिटेबल ट्रस्ट आणि प्रत्यय नाट्य संस्थेच्यावतीने आयोजित प्रत्यय नाट्य महोत्सवांतर्गत शनिवारी झालेल्या रंगसंवाद कार्यक्रमात अभिनेते, कवी किशोर कदम यांनी रसिकांशी संवाद साधला.

ठळक मुद्देकठीण काळात तग धरुण राहण्यातच खरी कसोटी : किशोर कदम प्रत्यय नाट्यमहोत्सवात साधला रंगसंवाद

कोल्हापूर : मी सत्यदेव दुबेंच्या तालमीत अभिनय शिकलो. नाटकापासून चित्रपटपर्यंतचा प्रवास सुरू असताना मधली पाच वर्षे माझ्याकडे एकही काम नव्हते. नैराश्य आणि वैफल्याने व्यसनाधीनतेच्या काठावर होतो, आत्महत्येचे विचार मनात यायचे या कठीण काळात तग धरुन राहण्यात खरी कसोटी होती. आणि मी यशस्वीपणे पार करू शकलो म्हणून आज तुमच्यापुढे आत्मविश्वासाने उभा आहे असे मनोगत अभिनेते, कवी किशोर कदम यांनी शनिवारी व्यक्त केले.

कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृहात कॉ. संतराम पाटील श्रमिक चॅरिटेबल ट्रस्ट आणि प्रत्यय नाट्य संस्थेच्यावतीने आयोजित प्रत्यय नाट्य महोत्सवांतर्गत झालेल्या रंगसंवाद कार्यक्रमात त्यांनी नव्या पिढीशी संवाद साधला. यावेळी डॉ. शरद भुताडिया, रसिया पडळकर उपस्थित होत्या.किशोर कदम म्हणाले, सत्यदेव दुबे रोज नवनवीन आव्हाने आणि निवडीचे पर्याय समोर ठेवायचे त्यावर निर्णय घेणे खूप अवघड असायचे. त्याच काळात मी नटसम्राट पदरात पाडून घेतला आणि डॉ. श्रीराम लागूंसोबत काम करण्याची संधी मिळाली. पुढे मला शरद जोशींच्या हिंदी साहित्याची आवड लागली. आनंदगौरी हे माझं आवडतं पुस्तक. अतुल पेठेंबरोबर चर्चा झाल्यानंतर आम्ही ते रंगमंचावर आणलं. गांधी विरुद्ध गांधी मधील हरीलाल मी रंगवला.

श्याम बेनेगल, अमोल पालेकर यांच्या चित्रपटांमध्ये काम केलो. पण त्यानंतरचा पाच वर्षांचा काळ माझी परीक्षा घेणारा होता. नंतर जोगवा आणि नटरंग चित्रपटांनी मला पून्हा या क्षेत्रात उभे केले. माझ्या पूर्वीच्या कविता या प्रेमकविता असायच्या आता नव्या कविता मात्र तुमच्यासमोर खूप वेगळ््या रुपात येतील. प्रकाश फडणीस यांनी त्यांची मुलाखत घेतली.दुपारी मॅथेमॅजिशियन व रात्री सियाह मंटो ही नाटके सादर झाली.

रविवारी महोत्सवातसकाळी दहा वाजता : अतुल पेठे यांच्याशी रंगसंवाददुपारी चार वाजता : विंदाक्षर ही विंदांच्या कवितांची मैफल आणि मधुचंद्र विरुपिका सादरीकरणसायंकाळी सहा वाजता : परवा आमचा पोपट वारला (नाटक) 

 

टॅग्स :Kishore kadamकिशोर कदमcultureसांस्कृतिकkolhapurकोल्हापूर