शहरं
Join us  
Trending Stories
1
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
2
'आधी १९७१ चा प्रश्न सोडवा, मग आपण चर्चा करू', बांगलादेशच्या भूमीवर पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांचा अपमान
3
बायकोला जाळणाऱ्या नवऱ्याचा एन्काउंटर; पायाला लागली गोळी, पळून जाण्याचा करत होता प्रयत्न
4
समुद्रात भारताची ताकद वाढणार, जर्मनीसोबत ७० हजार कोटींचा करार; ६ हाय-टेक पाणबुड्या बांधणार
5
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठी 'इनिंग' संपली; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!
6
युक्रेनमध्ये हाहाकार, रशियानं 143 ठिकाणांवर केली  बॉम्बिंग; डोनेत्स्कमध्ये दोन गावांवर कब्जा!
7
"हुंड्यात स्कॉर्पिओ, बुलेट दिली तरी माझ्या मुलीची हत्या, आरोपींच्या घरावर बुलडोझर चालवा अन्यथा..."
8
एआयची कमाल, 25 वर्षांनंतर परतला महिलेचा आवाज...! कसा घडला हा चमत्कार? जाणून थक्क व्हाल!
9
लग्नाला ८ वर्षं होऊनही मुलबाळ नाही, तांत्रिक महिलेला म्हणाला तंत्रमंत्राने गर्भधारणा करतो, त्यानंतर...
10
फलकावरुन झालेल्या वादातून दगडफेक; कोल्हापुरात दोन्ही गटांतील ४०० जणांवर दंगलीचा गुन्हा, लाखोंचे नुकसान
11
राहुल द्रविडनंतर तोच! चेतेश्वर पुजाराच्या टॉप-५ रेकॉर्ड ब्रेक इनिंग
12
Mahindra च्या नवीन SUV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; फक्त अडीच मिनिटांत बुक झाला स्टॉक
13
अरे देवा! मृताच्या कुटुंबाला ६ लाखांची मदत जाहीर; ६ महिला म्हणतात, "मीच यांची खरी बायको..."
14
'अमेरिका रशियन तेल खरेदीची परवानगी देतो; हा ढोंगीपणा...' भारतीय कंपन्यांनी केली पोलखोल
15
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
16
दे दणादण! मेट्रोमध्ये एकमेकींच्या झिंज्या उपटल्या तरी गप्प नाही बसल्या, Video तुफान व्हायरल
17
बँक एफडीपेक्षा जास्त व्याज! पोस्ट ऑफिसची या योजनेत १ लाख रुपयांवर मिळेल २३,५०८ रुपयांचा नफा
18
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?
19
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
20
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका

मराठा मोर्चासाठी कोल्हापूर सज्ज

By admin | Updated: October 14, 2016 01:35 IST

इतिहास घडणार : गांधी मैदान येथून प्रारंभ

कोल्हापूर : साऱ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूरच्या सकल मराठा क्रांती मूक मोर्चाचा प्रारंभ गांधी मैदान येथून उद्या, शनिवारी सकाळी ११ वाजता होणार आहे. हा मोर्चा ऐतिहासिक ठरणार असल्याने त्यासाठी संपूर्ण यंत्रणा सज्ज असल्याची माहिती मोर्चा संयोजन समितीने पत्रकार परिषदेत दिली.या नियोजनाबाबत माहिती अशी की, मोर्चाला गांधी मैदान येथून सकाळी ११ वाजता प्रारंभ होणार आहे. गांधी मैदानमध्ये राष्ट्रमाता जिजाऊ, महात्मा गांधी यांच्या पुतळ्याचे पूजन व जिजाऊवंदनानंतर मोर्चाची सुरुवात होणार आहे. याच वेळी सकाळी ११ वाजता गांधी मैदानसह ताराराणी चौक, तपोवन मैदान-शेंडा पार्क, कसबा बावडा (पॅव्हेलियन मैदान), शिवाजी विद्यापीठ परिसर येथूनही मोर्चाला प्रारंभ होणार आहे. गांधी मैदान येथून निघणाऱ्या मोर्चात प्रथम १० मुली अग्रभागी राहतील. त्या पूर्णपणे विशिष्ट गणवेशात राहतील. यांपैकी पाच मुलींच्या हाती क्रांतिज्योत असेल. या दहा मुलींना सुरक्षा कडे राहणार आहे. या मुलींच्या पाठीमागे महिला, महाविद्यालयीन युवक, पुरुष व त्यानंतर राजकीय नेते असा क्रम असणार आहे. या चार ठिकाणांहून निघणाऱ्या मोर्चातील अग्रभागी असणाऱ्या एकूण २५ हजार युवतींच्या हाती लहान-मोठे, तर सुमारे दोनशे महिलांच्या हाती भव्य मोठे झेंडे लक्ष वेधणार आहेत.१४ स्क्रीनवर थेट प्रक्षेपणसंपूर्ण मोर्चा मार्गावर सूचना देण्यासाठी एफ. एम. यंत्रणा कार्यरत असून मोर्चाच्या संपूर्ण मार्गावर १४ भव्य एल. ई. डी. स्क्रीन उभारण्यात येणार आहे. या स्क्रीनवर मोर्चाचे थेट प्रक्षेपण दाखविण्यात येणार आहे. शिवाय दसरा चौकातील छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यापासून दोन किलोमीटर अंतरापर्यंत सुमारे २०० ध्वनिक्षेपक लावण्यात येणार आहेत.भाषण, निवेदन वाचनासाठी युवतीदसरा चौकात दुपारी एक वाजता एक युवती भाषण, एक युवती निवेदन वाचन, एक युवती राष्ट्रगीत म्हणणार, तसेच आणखी दोन युवती जादा उपस्थित राहणार आहेत. तत्पूर्वी, पाच युवती जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार आहेत. या युवतींची नावे गोपनीय ठेवण्यात आलेली आहेत.मोर्चामागे राजकीय नेतेगांधी मैदान येथून निघणाऱ्या मोर्चाच्या सर्वांत मागे राजकीय व्यक्ती राहणार आहेत; तर सर्व खासदार, आमदार व आणखी राजकीय नेते हे मोर्चाच्या शेवटी वृषाली हॉटेल ते ताराराणी चौकापर्यंत येतील.महामार्गावर दिशादर्शक नकाशेराष्ट्रीय महामार्गावरून प्रामुख्याने नागरिकांची गर्दी शहरात येणार असल्याने महामार्गावर सांगली फाटा, गोकुळ शिरगावनजीक मावळे वाहनांसाठी दिशादर्शक नकाशे व फलक उभे करणार आहेत.सोनतळी ते शिवाजी पूल केएमटी सेवाशहरापासून किमान चार किलोमीटर अंतरावर सोनतळी येथे वाहन पार्किंग व्यवस्था असल्याने तेथे पार्किंग केलेल्या नागरिकांसाठी शिवाजी पुलापर्यंत नेण्यासाठी १५ केएमटी बसेसची सोय करण्यात आली आहे. याशिवाय पार्किंगच्या ३७ ठिकाणी ‘केएमटी’च्या २०० अधिकाऱ्यांसह, वाहतूक शाखेचे सुमारे २०० पोलिस कार्यरत राहणार आहेत.चंद्रकांतदादांनी मोर्चात सहभागी व्हावेपालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी निवेदन स्वीकारण्यावरून झालेला वाद संपुष्टात आला आहे. आमची सगळ््याच नेत्यांनी मोर्चात त्यांच्या-त्यांच्या भागात सहभागी व्हावे, अशी अपेक्षा आहे. त्यानुसार पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनीही सन्मानाने मोर्चात सहभागी व्हावे, त्यास आमची हरकत असण्याचे कारण नाही, अशी अपेक्षा सकल मराठा समाजाच्यावतीने गुरुवारी व्यक्त करण्यात आली. त्यामुळे पालकमंत्री पाटील हे देखील मोर्चात सहभागी होण्याची शक्यता आहे.