शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : आरसी गँगच्या रवी शिंदेवर गुन्हा, भररस्त्यावर बहिणीला बेदम मारहाण प्रकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 12:47 IST

सुभाषनगर येथील भररस्त्यावर स्वत:च्या विवाहीत बहिणीला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केल्याप्रकरणी आरसी गँगचा म्होरक्या रवी सुरेश शिंदे (रा. साळुंखे पार्क, कोल्हापूर) याचेवर राजारामपूरी पोलीस ठाण्यात रविवारी रात्री गुन्हा दाखल झाला. मारहाणीत कौसर वसिम पखाली (वय २७) या गंभीर जखमी झाल्या असून त्यांना राजारामपूरीतील खासगी रुग्णालयात दाखल केले आहे.

ठळक मुद्देआरसी गँगच्या रवी शिंदेवर गुन्हाभररस्त्यावर बहिणीला बेदम मारहाण प्रकरण

कोल्हापूर : सुभाषनगर येथील भररस्त्यावर स्वत:च्या विवाहीत बहिणीला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केल्याप्रकरणी आरसी गँगचा म्होरक्या रवी सुरेश शिंदे (रा. साळुंखे पार्क, कोल्हापूर) याचेवर राजारामपूरी पोलीस ठाण्यात रविवारी रात्री गुन्हा दाखल झाला. मारहाणीत कौसर वसिम पखाली (वय २७) या गंभीर जखमी झाल्या असून त्यांना राजारामपूरीतील खासगी रुग्णालयात दाखल केले आहे.अधिक माहिती अशी, कौसर हिने वसिम पखाली यांचेसोबत आंतरजातीय विवाह केला आहे. गेली आठ-नऊ वर्ष ती भाऊ रवी शिंदे व कुटूंबाच्या संपर्कात नाही. ती पती, व मुलांसह सुभाषनगर येथे राहते. घरच्यांच्या विरोधात लग्न केल्याने शिंदे बहिण कौसरवर चिडून होता.

शनिवारी रात्री घरासमोर कौसर ह्या मुलगा फाजेल यांचेसाबत घरासमोर बोलत बसली होती. यावेळी रवी शिंदेने याठिकाणी येवून लाकडी दांडक्याने बहिण कौसर हिला मारहाण केली. भररस्त्यावर मारहाण होत असताना शिंदे याच्या दहशतीमुळे पुढे कोणीच गेले नाही. अक्रम नदाम व नवाज जमादार यांनी कौसर हिला शिंदेच्या ताब्यातून सोडविण्याचा प्रयत्न केला, परंतू त्यांनाही त्याने धमकी दिली.

येथील काही महिलांनी सामाजिक कार्यकर्त्या हसिना शेख यांना फोन करुन बोलवून घेतले. त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत कौसर हिची सुटका केली. तेथून तिला राजारामपूरी पोलीसांच्या सांगण्यावरुन परिसरातील खासगी रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी तिचा पती वसिम इब्राहीम पखाली (२९) यांनी फिर्याद दिली. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक शहाजी निकम करीत आहेत. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrimeगुन्हा