शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : राजेंद्र मदने, आंबोलीतील मलबार नेचर संस्थेस ‘वसुंधरा’ पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 16:30 IST

राजेंद्र मदने यांना ‘वसुंधरा सन्मान’ , आंबोलीतील मलबार नेचर क्लब संस्थेस ‘वसुंधरा मित्र’ पुरस्कार देऊन सन्मानित केले जाणार आहे, अशी माहिती उदय गायकवाड आणि कृष्णा गावडे यांनी बुधवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्दे राजेंद्र मदने, आंबोलीतील मलबार नेचर संस्थेस ‘वसुंधरा’ पुरस्कारनवव्या चित्रपट महोत्सवाचा सोमवारी प्रारंभ; अनिल अवचट यांची प्रमुख उपस्थिती

कोल्हापूर : ‘प्रदूषण टाळा-नदी वाचवा’ या संकल्पनेवर आधारित नववा किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव दि. १ ते ४ आॅक्टोबर दरम्यान राजर्षी शाहू स्मारक भवनमध्ये होणार आहे. त्यामध्ये नदी पुनरूज्जीवनासाठी काम करणाऱ्या राजेंद्र मदने यांना ‘वसुंधरा सन्मान’ , आंबोलीतील मलबार नेचर क्लब संस्थेस ‘वसुंधरा मित्र’ पुरस्कार देऊन सन्मानित केले जाणार आहे, अशी माहिती उदय गायकवाड आणि कृष्णा गावडे यांनी बुधवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.गायकवाड म्हणाले, या महोत्सवाचे उदघाटन सोमवारी (दि. १ आॅक्टोबर) सायंकाळी पाच वाजता ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल अवचट यांच्या हस्ते, तर किर्लोस्कर उद्योग समूहाचे संजीव निमकर, चंद्रहास रानडे, टी. विनोदकुमार यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.

शिवाजी विद्यापीठातील पर्यावरणशास्त्र विभागप्रमुख प्रा. पी. डी. राऊत, ‘सायबर इन्स्टिट्यूट’चे डॉ. एस. डी. कदम, डॉ. अनिल कुलकर्णी यांना ‘वसुंधरा गौरव’, तर मलबार नेचर क्लबला, राधानगरीमधील तुषार साळगावकर, छायाचित्रकार बी. डी. चेचर यांना ‘वसुंधरा मित्र’ पुरस्कार मंगळवारी (दि.२) सायंकाळी पाच वाजता कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात येईल.

गुरूवारी (दि.४) सायंकाळी पाच वाजता नदी पुनरूज्जीवनासाठी काम करणाऱ्या मदने यांना ज्येष्ठ पत्रकार उदय कुलकर्णी यांच्या हस्ते ‘वसुंधरा सन्मान’ पुरस्कार देऊन सन्मानित केले जाईल. या पत्रकार परिषदेस अजेय दळवी, अनिल चौगुले, विजय टिपुगडे, केदार मुनीश्वर, राहुल पवार, ऐश्वर्या मुनीश्वर, भाऊ सूर्यवंशी उपस्थित होते.

 

टॅग्स :environmentवातावरणkolhapurकोल्हापूर