शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : राजारामपुरीत ध्वनियंत्रणेला फाटा; पण डोळे दुखवणारा लेसर लाईट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2018 14:11 IST

धडकी भरणाऱ्या ध्वनियंत्रणेला तिलांजली देत यंदा पारंपरिक वाद्यांच्या गजरात राजारामपुरीतील श्री गणेश आगमनाच्या मिरवणुकीचा नवा पायंडा गुरुवारी पाडला. डोळे दिपवणारा व डोळे दुखवणारा अत्याधुनिक लेसर शो व भव्य वॉलच्या भिंती उभारण्यात आल्या होत्या.

ठळक मुद्देराजारामपुरीत ध्वनियंत्रणेला फाटा; पण डोळे दुखवणारा लेसर लाईटअत्याधुनिक लेसर शो; पारंपरिक वाद्यांचा गजर; मिरवणूक मार्गावर भक्तांचा महासागर

कोल्हापूर : धडकी भरणाऱ्या ध्वनियंत्रणेला तिलांजली देत यंदा पारंपरिक वाद्यांच्या गजरात राजारामपुरीतील श्री गणेश आगमनाच्या मिरवणुकीचा नवा पायंडा गुरुवारी पाडला. डोळे दिपवणारा व डोळे दुखवणारा अत्याधुनिक लेसर शो व भव्य वॉलच्या भिंती उभारण्यात आल्या होत्या.

गेली काही वर्षे राजारामपुरीतील गणेश आगमन मिरवणुकीत धडकी भरणाऱ्या आवाजाच्या ध्वनियंत्रणेचे पडसाद विसर्जन मिरवणुकीत उमटत होते. त्यामुळे यंदा पोलीस प्रशासनाने प्रथम प्रबोधन व नंतर कायद्याचा बडगा दाखवीत मंडळांचे मतपरिवर्तन केले. त्यामुळे यंदा राजारामपुरीतील मंडळाच्या मिरवणुकीत ध्वनियंत्रणा लागणार का? हाच विषय चर्चेचा होता; पण मंडळांनी पारंपरिक वाद्यांचा स्वीकार केल्याने पोलीस प्रशासनावरील ताण कमी झाला.मंडळातील पुढे जाण्यावरून होणारी वादावादी टाळण्यासाठी पोलीस प्रशासनाने प्रथमच चिठ्ठ्यांद्वार मंडळांना मिरवणुकीत सहभागाचा अग्रक्रम ठरवून दिला होता. त्यानुसार राजारामपुरी आठ नंबर शाळेपासून सुरू झालेली मिरवणूक शाहू मिल पोलीस चौकी, जनता बझार चौक ते मुख्य रस्ता अशी रात्री उशिरापर्यंत जल्लोषी वातावरणात सुरू होती; पण मिरवणुकीतील ध्वनियंत्रणेला फाटा दिला असला तरीही अत्याधुनिक लेसर शो हा अनेकांचे डोळे दुखवणारा ठरल्याच्या तक्रारी करण्यात आल्या.अमृत देशमुख, औदुंबर पाटील एकत्रराजारामपुरी पोलीस ठाण्याचे तत्कालीन निरीक्षक अमृत देशमुख व सध्याचे पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील हे दोघे गुरुवारी गणेश आगमनावेळी राजारामपुरी जनता बझार चौकात एकत्र थांबले होते. त्यांनी एकमेकांच्या हातात हात दिला. दोन वर्षांपूर्वी देशमुख यांनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गणेशोत्सवाच्या काळात चांगल्या प्रकारे परिस्थिती हाताळली होती.

 

टॅग्स :Ganesh Chaturthi 2018गणेश चतुर्थी २०१८kolhapurकोल्हापूर