शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : शिष्यवृत्ती परीक्षेत राधानगरी तालुका राज्यात 'लय भारी '

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2018 15:26 IST

शिष्यवृत्ती परीक्षा पॅटर्न मध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्याने पुन्हा एकदा आपला दबदबा निर्माण केला आहे.

ठळक मुद्देशिष्यवृत्ती परीक्षेत राधानगरी तालुका राज्यात 'लय भारी 'पाचवीतील ७५ तर आठवीतील ७४ असे १४९ विद्यार्थी पात्र

श्रीकांत ऱ्हायकरकोल्हापूर/धामोड :  शिष्यवृत्ती परीक्षा पॅटर्न मध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्याने पुन्हा एकदा आपला दबदबा निर्माण केला आहे.

कोल्हापूर जिल्हयाबरोबर राज्यातही शिष्यवृत्ती पॅटर्न मध्ये सवतःचा वेगळा ठसा उमठवत आम्हीच ' लय भारी ' असल्याचे तालुक्यातील शिक्षकांनी सिध्द करून दाखवले दाखवत, पाचवीतील ७५ तर आठवीतील ७४ असे १४९ विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरवले आहेत .महाराष्ट्रराज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने फेब्रुवारी महिन्यात घेण्यात आलेल्या शासकीय शिष्यवृत्ती परीक्षेत राधानगरी तालुक्याने महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक पटकावत,तालुक्यातील विविध शाळेतील १४९ विध्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत.राधानगरी तालुका हा तसा ग्रामीण, दुर्गम व डोंगराळ तालुका म्हणून ओळखला जातो . शहरी भागाच्या तुलनेत आजही म्हणाव्या तितक्या शैक्षणिक सेवा सुविधा तालुक्याच्या बहुतांशी भागात पोहचलेल्याच नाहीत. पण तरीही उपलब्ध शैक्षणिक सुविधांचा वापर करून येथील शाळेतील विद्यार्थ्यांनी जे यश संपादन केले आहे ते खरोखरच राधानगरी शिक्षण पॅटर्नची चमकदार कामगिरी निर्देशित करणारे आहे.राधानगरी तालुक्याची ओळख ही तशी पाणी व पर्यटन दृष्टया समृध्द तालुका एवढीच मर्यादीत. पण गेल्या पाच -सहा वर्षापासून शिष्यवृत्ती परीक्षेत तालुक्याने स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यात तालुक्याला या वर्षी मोठे यश आले आहे.

तालुक्याने यावर्षीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात आघाडी घेत राज्यात पहिला क्रमांक पटकावला आहे. तालुक्याच्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत चमकण्याचा मान मिळवत आप- आपल्या शाळांचेही नाव राज्य गुणवत्ता यादीत कोरले आहे .राधानगरी तालुक्याने गेली पस्तीस वर्षे शिष्यवृत्ती परीक्षेत उज्वल यश संपादन करण्याचा प्रयत्न कायम ठेवला आहे. सराव परीक्षा, रचनावादी अध्यापन, नवीन तंत्रे, गट चर्चा, ज्ञान रचनावादी अभ्यासक्रम या तंत्रांचा वापर करून तालुक्यातील शिक्षकांनी स्वतःची गुणवत्ता सिद्ध केली आहे. शिक्षकांनी घेतलेल्या या मेहनतीमुळे पालक वर्गातून समाधान केले जात आहे.

राधानगरी तालुक्यातील शिष्यवृत्ती परीक्षेची परंपरा व राज्यात वेगळा दबदबा निर्माण करण्यामध्ये शिक्षक व विद्यार्थी वर्गाचे मोठे योगदान आहे व याचा मलाही अभिमान आहे .डी.ए.पाटीलप्रभारी गट शिक्षणाधिकारी, राधानगरी.शिष्यवृत्ती परिक्षेत राधानगरी सारख्या ग्रामीण भागातील मुलांनी उपलब्ध साधन सामुग्रीचा बळावर मिळवलेले यश आमच्या साठी निस्थितच एक वेगळी उर्जा निर्माण करणारे आहे .रणजीत रेडेकर( अध्यापक -वि. मं . खामकरवाडी )

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रkolhapurकोल्हापूर