शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

कोल्हापूर : गुन्हेगाराला शिक्षा होणे म्हणजे सत्याचा शोध घेणे : अभिनव देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2018 12:24 IST

पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याचा तपास योग्य करणे, गुन्हेगाराला शिक्षेस पात्र करणे, म्हणजे सत्याचा शोध घेतल्यासारखे आहे, हेच न्यायदेवतेला अभिप्रेत आहे, असे प्रतिपादन पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी केले.

ठळक मुद्देगुन्हेगाराला शिक्षा होणे म्हणजे सत्याचा शोध घेणे : अभिनव देशमुखविधिज्ञांनी केले मार्गदर्शन : दोषसिद्धी कार्यशाळा संपन्न

कोल्हापूर : पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याचा तपास योग्य करणे, गुन्हेगाराला शिक्षेस पात्र करणे, म्हणजे सत्याचा शोध घेतल्यासारखे आहे, हेच न्यायदेवतेला अभिप्रेत आहे, असे प्रतिपादन पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी केले.शाहूवाडी विभागीय पोलीस कार्यालयाच्या वतीने पोलीस मुख्यालयात दोषसिद्धी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले होते. त्यावेळी डॉ. देशमुख बोलत होते. त्यांनी तपास करताना घ्यावयाची दक्षता, तपासामध्ये भारतीय पुरावा कायदा, तसेच तांत्रिक पुरावा यांचे महत्त्व सांगून गुन्हे दोषसिद्धी वाढविण्याबाबत मार्गदर्शन केले.

ज्येष्ठ विधिज्ञ शिवाजीराव राणे यांनी सत्र न्यायालयात चालणाऱ्या गुन्ह्यांचे तपासादरम्यान राहणाऱ्या त्रुटींबाबत अवगत करून त्या कशा पद्धतीने टाळता येतील आणि गुन्हा घडल्यापासून गुन्ह्यांची माहिती फिर्यादीद्वारा प्राप्त झाल्यापासून घटनास्थळाचा पंचनामा, जबाब, तपास टिपणे, नेमक्या व मोजक्या शब्दांत नोंद करण्याबाबत माहिती दिली.

सरकारी वकील विवेक शुक्ल यांनी न्यायालयीन गुन्हे, तपास व दोषसिद्धीसंबंधी मार्गदर्शन करून साक्षीदार, पंच व सरकारी अभियोक्ता यांच्यासोबत तपासी अंमलदाराचा समन्वय असणे गरजेचे आहे, असे सांगितले. अनुराधा देसाई यांनी वाढते अपघात ही चिंतेची बाब असून, लोकांनी हेल्मेट, सीट बेल्ट वापरणे व स्वत:च्या सुरक्षिततेची काळजी घेणे गरजेचे आहे. अपघाताचे गुन्हे आणि तपास, त्यांचे पंचनामे याबाबत मार्गदर्शन केले.

सरकारी वकील सुजाता इंगळे यांनी लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण व महिला अत्याचारावरील गुन्ह्यांच्या तपासाबाबत मार्गदर्शन केले. अ‍ॅड. उदयसिंह जगताप यांनी गर्दी, मारामारी व प्रथमवर्ग न्यायालयात चालणाऱ्या गुन्ह्यांच्या तपासाबाबत मार्गदर्शन केले.

यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक तिरूपती काकडे, पोलीस उपअधीक्षक आर. आर. पाटील, महिला परिवीक्षा उपअधीक्षक डॉ. रोहिणी साळोखे, सहायक पोलीस निरीक्षक मंगेश देसाई, आदींसह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. 

 

टॅग्स :Policeपोलिसkolhapurकोल्हापूर