शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
2
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
3
फक्त आरोग्य विमा काढणे पुरेसे नाही? 'या' एका नियमामुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होईल, खिशाला बसेल भुर्दंड
4
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
5
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
6
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
7
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
8
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
9
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
10
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच
11
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
12
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, निफ्टी ७० अंकांच्या तेजीसह उघडला; मेटल-रियल्टी शेअर्समध्ये खरेदी
13
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
14
ऑफर्स, ऑनलाईन चॅट्स, फसवणुकीचं जाळं...; iPhone चं आमिष दाखवून लाखोंची फसवणूक
15
भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले
16
आधार कार्डापासून ते बॅंक अकाऊंट पर्यंत, १ नोव्हेंबरपासून बदलणार ‘हे’ ५ नियम; तुमच्या खिशावर थेट होणार परिणाम
17
आंतरराष्ट्रीय जुजित्सू खेळाडू रोहिणी कलम यांनी आयुष्य संपविले; एक फोन आला आणि ती खोलीत गेली...
18
८ मिनिटांत ८ अब्ज रुपयांचे दागिने चोरणारे चोर सापडले; पॅरिसच्या म्युझियममध्ये टाकलेला दरोडा
19
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
20
टॅरिफची धमकी मिळाल्याने थायलंड-कंबोडियात युद्धबंदी; ट्रम्प यांच्या आणखी एका मध्यस्थीला मिळाले यश

कोल्हापूर : विद्यार्थी पटसंख्या वाढसाठी जनजागृती रॅली, महापालिकेच्या शिक्षण मंडळ समितीतर्फे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2018 16:16 IST

कोल्हापूर महापालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थी पटसंख्या वाढविणे, नागरिकांचा महापालिकेच्या शाळांकडे बघण्याचा दृष्टिकोन आदी प्रचार व प्रसारासाठी जनजागृती दूचाकी रॅली मंगळवारी दसरा चौकातून काढण्यात आली.

ठळक मुद्देविद्यार्थी पटसंख्या वाढसाठी जनजागृती रॅलीमहापालिकेच्या शिक्षण मंडळ समितीतर्फे आयोजन

कोल्हापूर : महापालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थी पटसंख्या वाढविणे, नागरिकांचा महापालिकेच्या शाळांकडे बघण्याचा दृष्टिकोन आदी प्रचार व प्रसारासाठी जनजागृती दूचाकी रॅली मंगळवारी दसरा चौकातून काढण्यात आली.

महापौर शोभा बोंद्रे यांच्या हस्ते ध्वज दाखवून रॅलीचे उदघाटन झाले. यावेळी आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी, शिक्षण समिती सभापती वनिता देठे आदींची प्रमुख उपस्थिती होती.प्राथमिक शिक्षण समितीच्या ५९ प्राथमिक शाळा आहेत. या शाळांमध्ये ९६५१ विद्यार्थ्यांची पटसंख्या आहे. सन २०१८-१९ मध्ये गुढीपाडव्या दिवशी १०२१ विद्यार्थ्यांची नोंदणी महापालिकेच्या शाळेत झाली आहे.

महापालिका शाळेतील वैशिष्ट्यांचा प्रचार व प्रसार होणे, शाळांमध्ये उपलब्ध असणाऱ्या सोयी सुविधा कामी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्यासमवेत दुचाकीवरुन या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

जवाहरनगर, राजोपाद्येनगर, फुलेवाडी, बावडा व टेंबलाईवाडी या पाच विभागातून शाळा परिसरात रॅली काढणेत आली. यानंतर या विभागातील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी दुचाकीवरुन मुख्य रॅलीसाठी दसरा चौक येथे एकत्रित आले होते.

रॅलीत सभागृह नेता दिलीप पोवार , नगरसेविका शोभा कवाळे, अ‍ॅड. सूरमंजिरी लाटकर, नगरसेवक अशोक जाधव, प्रभारी प्रशासन अधिकारी एस. के. यादव , रसुल पाटील , बाबा साळोखे , विजय माळी, बाळासाहेब कांबळे, उषा सरदेसाई, सचिन पांडव यांच्यासह संदिप उबाळे, जगदिश ठोंबरे, सुर्यकांत ढाले, अजय गोसावी, संजय शिंदे, निलेश सरनाईक, नचिकेत सरनाईक, शांताराम सुतार आदींचा सहभाग होता. दसरा चौक येथून अयोध्या टॉकीज, बिंदू चौक, शिवाजी रोड , शिवाजी पुतळा,सीपीआर चौक मार्गे दसरा चौकात रॅलीचा समारोप झाला.पथनाट्य...महापालिकेच्या शाळांप्रश्नी प्रभाकर लोखंडे, विठ्ठल देवणे, तानाजी दराडे, साताप्पा पाटील, प्रकाश गावडे, विजय सुतार, सरिता सुतार, सरिता कांबळे, वंदिता लव्हटे, समिधा चौगुले यांचा सहभाग होता. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMarketबाजार