शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर :  कांदा अनुदान प्रस्तावास प्रतिसाद, ३७५ शेतकऱ्यांचे बाजार समितीकडे प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2019 16:06 IST

राज्य सरकारच्या कांदा अनुदानासाठी कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीने केलेल्या आवाहनास चांगला प्रतिसाद मिळत आहे. १ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर या कालावधीत बाजार समितीत ११ हजार ३४१ शेतकऱ्यांनी कांद्याची आवक केली आहे. आतापर्यंत ३७५ शेतकऱ्यांनी विहित नमुन्यांतील प्रस्ताव दाखल केले आहेत. प्रस्ताव दाखल करण्यास १५ जानेवारीपर्यंत मुदत आहे.

ठळक मुद्दे कांदा अनुदान प्रस्तावास प्रतिसाद: १५ जानेवारीपर्यंत मुदत३७५ शेतकऱ्यांचे बाजार समितीकडे प्रस्ताव

कोल्हापूर : राज्य सरकारच्या कांदा अनुदानासाठी कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीने केलेल्या आवाहनास चांगला प्रतिसाद मिळत आहे. १ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर या कालावधीत बाजार समितीत ११ हजार ३४१ शेतकऱ्यांनी कांद्याची आवक केली आहे. आतापर्यंत ३७५ शेतकऱ्यांनी विहित नमुन्यांतील प्रस्ताव दाखल केले आहेत. प्रस्ताव दाखल करण्यास १५ जानेवारीपर्यंत मुदत आहे.खरीप हंगामात अपुऱ्या पावसामुळे कांद्याच्या उत्पादनावर परिणाम झाला. त्याचबरोबर कर्नाटक, गुजरात, राजस्थान, आदी शेजारील राज्यांत कांद्याचे उत्पादन चांगले झाल्याने दक्षिण व उत्तर भारतातून कांद्याची मागणी कमी झाली. नोव्हेंबर महिन्यात कांद्याचे पीक एकदम बाजारात आल्याने कांद्याचे दर गडगडले.

कांद्याला प्रतिक्विंटल २५० ते ९०० रुपये अत्यल्प भाव मिळाल्याने शेतकरी हवालदिल झाले होते. शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी १ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर या कालावधीत विक्री झालेल्या कांद्यास प्रतिक्विंटल २०० रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला. या कालावधीत ज्या शेतकऱ्यांनी समित्यांमध्ये कांदा विक्री केली, त्याची माहिती संकलन करण्याचे आदेश संबंधित समित्यांना दिले आहेत.कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये या दीड महिन्याच्या कालावधीत सोलापूर, पुणे, सातारा, अहमदनगर, नाशिकसह इतर जिल्ह्यांतून ११ हजार ३४१ शेतकऱ्यांनी एक लाख ८२ हजार २४५ क्विंटल कांद्या विक्री केली आहे. सरकारच्या या निर्णयानुसार प्रतिक्विंटल २०० रुपये अनुदान मिळणार असून, त्याची रक्कम तीन कोटी ६४ लाख रुपये होते. संबंधित शेतकऱ्यांना अनुदानाचे प्रस्ताव दाखल करण्याचे आवाहन समितीने केले आहे.गेल्या चार ते पाच दिवसांत ३७५ शेतकऱ्यांनी समितीकडे प्रस्ताव दाखल केले आहेत. प्रस्ताव दाखल करण्यास अजून आठ दिवसांची मुदत आहे. दाखल प्रस्तावांची सरकारच्या निकषांनुसार लेखापरीक्षकांच्या माध्यमातून तपासणी सुरू आहे. १८ जानेवारीपर्यंत प्रस्तावांची तपासणी करून ते अनुदानासाठी सरकारकडे पाठविले जाणार आहेत.

तपासणीची जबाबदारी या लेखापरीक्षकांवरबी. जे. पवार, एल. बी. माने, सी. आर. पोतदार, ए. पी. पाटील, एस. एच. पवार, एस. पी. ओडीसमठ, के. जी. शिरढोणे, एस. डी. कोळेकर, व्ही. बी. खेडकर, एस. एम. निढुरे

सरकारच्या अनुदानाचा लाभ घेण्यासाठी समितीच्यावतीने शेतकऱ्यांना प्रस्ताव दाखल करण्याचे आवाहन केले असून, त्यांच्याकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. अजून आठ दिवस मुदत असून, उर्वरित शेतकऱ्यांनी परिपूर्ण अर्ज दाखल करावेत.- मोहन सालपे, सचिव, बाजार समिती

 

टॅग्स :onionकांदाkolhapurकोल्हापूर