शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : प्राध्यापकांचे २५ सप्टेंबरपासून बेमुदत कामबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2018 16:49 IST

उच्च शिक्षण क्षेत्राबाबत राज्य सरकारच्या असलेल्या उदासीन आणि नकारात्मक धोरणामुळे राज्यातील नियमित आणि तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांवर (सीएचबीधारक) बेमुदत कामबंद आंदोलन करण्याची वेळ आली आहे.

ठळक मुद्दे प्राध्यापकांचे २५ सप्टेंबरपासून बेमुदत कामबंद‘सुटा’तर्फे उद्या मेळावा; बी. टी. देशमुख यांची प्रमुख उपस्थिती

कोल्हापूर : उच्च शिक्षण क्षेत्राबाबत राज्य सरकारच्या असलेल्या उदासीन आणि नकारात्मक धोरणामुळे राज्यातील नियमित आणि तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांवर (सीएचबीधारक) बेमुदत कामबंद आंदोलन करण्याची वेळ आली आहे.

विविध मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र फेडरेशन आॅफ युनिव्हर्सिटी अँड कॉलेज टीचर्स असोसिएशनच्या (एम्फुक्टो)नेतृत्वाखाली प्राध्यापकांनी आंदोलन सुरू केले आहे. त्यातील एक भाग म्हणून रविवारी (दि. १६) दुपारी एक वाजता डॉ. बापूजी साळुंखे सभागृहात प्राध्यापकांचा मेळावा होणार आहे. त्यासाठी माजी आमदार बी. टी. देशमुख प्रमुख उपस्थित असणार आहेत, अशी माहिती शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघाचे (सुटा) अध्यक्ष डॉ. आर. एच. पाटील यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली.अध्यक्ष पाटील म्हणाले, राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्रातील भरतीबंदीमुळे सुमारे ११ हजार प्राध्यापक, सहायक प्राध्यापकांची पदे रिक्त आहेत. त्याचा परिणाम उच्च शिक्षणाच्या गुणवत्तेवर होत आहे; त्यामुळे रिक्त जागांवर प्राध्यापकांची कायमस्वरूपी भरती व्हावी, यासह विविध मागण्यांसाठी ‘एम्फुक्टो’ने दि. ६ आॅगस्टपासून आंदोलन सुरू केले.

या आंदोलनातील सहा टप्पे पूर्ण झाले आहेत; मात्र, अद्यापही राज्य सरकार अथवा उच्चशिक्षणमंत्री प्राध्यापकांच्या मागण्यांबाबत चर्चा करायला तयार नाहीत. प्रमुख कार्यवाह प्रा. डी. एन. पाटील म्हणाले, रविवारी होणाऱ्या मेळाव्यास शिवाजी विद्यापीठ आणि सोलापूर विद्यापीठातील प्राध्यापक उपस्थितीत राहणार आहेत. या पत्रकार परिषदेस प्रा. सुधाकर मानकर, टी. व्ही. स्वामी, आर. जी. कोरबू, आर. के. चव्हाण, आदी उपस्थित होते.महाविद्यालयांचे कामकाज होणार ठप्पप्रलंबित मागण्यांबाबत उच्च शिक्षण मंत्र्यांनी ‘एम्फुक्टो’समवेत चर्चा करून निर्णय न घेतल्यास दि. २५ सप्टेंबरपासून प्राध्यापकांच्यावतीने बेमुदत कामबंद आंदोलन केले जाणार आहे. या आंदोलनामुळे महाविद्यालयांचे कामकाज ठप्प होणार आहे. त्याची सर्वस्वी जबाबदारी राज्य शासनावर राहील, असे ‘सुटा’चे सहकार्यवाह प्रा. सुभाष जाधव यांनी सांगितले. 

 

टॅग्स :Shivaji Universityशिवाजी विद्यापीठProfessorप्राध्यापकkolhapurकोल्हापूर