शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
5
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
6
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
7
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
8
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
9
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
10
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
11
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
12
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
13
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
14
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
15
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
16
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
17
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
18
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
19
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
20
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : बाबूजमाल येथील गलेफ मिरवणूक उत्साहात, घोड्यांचा लवाजमा, सर्वधर्मियांचा सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 17:57 IST

हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असणाऱ्या हजरत पीर बाबूजमाल कलंदर (शहाजमाल) यांच्या दर्गाह शरीफ येथील उरुसानिमित्त मंगळवारी रात्री गलेफ मिरवणूक काढण्यात आली. यावेळी सर्वधर्मीय भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

ठळक मुद्देबाबूजमाल येथील गलेफ मिरवणूक उत्साहातघोड्यांचा लवाजमा, सर्वधर्मियांचा सहभाग

कोल्हापूर : हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असणाऱ्या हजरत पीर बाबूजमाल कलंदर (शहाजमाल) यांच्या दर्गाह शरीफ येथील उरुसानिमित्त मंगळवारी रात्री गलेफ मिरवणूक काढण्यात आली. यावेळी सर्वधर्मीय भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.येथील बाबूजमाल दर्गाह येथे दरवर्षी हा ऊरूस विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा केला जातो. या अंतर्गंत गलेफ मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले. फकिरांचा रतिक खेळ झाल्यानंतर ढोल-ताशांचा गजरात रात्री सवाद्य वाजत गलेफ मिरवणूक काढण्यात आली.

कोल्हापुरातील येथील हजरत पीर बाबूजमाल कलंदर (शहाजमाल) यांच्या दर्गाह शरीफ येथील उरुसानिमित्त मंगळवारी रात्री गलेफ मिरवणूक काढण्यात आली.यावेळी मोठ्या प्रमाणात भाविकांनी गर्दी केली होती. (छाया : दीपक जाधव)दर्ग्यांमध्ये फतिहा पठण झाल्यानंतर पारंपरिक वाद्ये, सजवलेल्या घोड्यांच्या लवाजम्यासह आतषबाजी मिरवणुकीला सुरुवात झाली. ही मिरवणूक येथील गावकामगार पाटील यांच्या घराला भेट देऊन गुजरी, जुना राजवाडा येथील राजर्षी शाहू महाराजांच्या गादीच्या ठिकाणी फतिहा पठण झाले. त्यानंतर शिवाजी चौकातील घुडणपीर दर्गापासून पापाची तिकटीमार्गे बाबूजमाल दर्गाह येथे रात्री उशिरा आली. तेथे नाल सलाम करून फतिहा पठण करण्यात आले. याठिकाणी गलेफ चढविण्यात आला.यावेळी दर्ग्यांचे मुख्य खादिम लियाकत मुजावर, एैनुद्दीन मुल्ला, अल्ताफ मुतवल्ली, शकील मुतवल्ली, इम्तियाज मुतवल्ली, दिलावर मुजावर, शाहरूख गडवाले यांच्यासह हिंदूधर्मिय मोठ्या संख्येन उपस्थित होते. दर्शनासाठी दर्गा बुधवारी पहाटेपर्यंत खुला होता.

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरReligious programmeधार्मिक कार्यक्रम