शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : वेगवान वाऱ्यामुळे सातत्याने तिरंगा फडकवणे अडचणीचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2018 12:40 IST

ताशी ३0 ते ३५ किलोमीटर वाहणाऱ्या वाऱ्यामुळे पोलीस उद्यानातील तिरंगा ध्वज सातत्याने फडकवता येत नाही. या वाऱ्यामुळे तो फाटण्याची शक्यता असल्याने ध्वजाचा सन्मान राखण्यासाठी हा निर्णय घ्यावा लागतो, अशी माहिती केएसबीपीचे अध्यक्ष सुजय पित्रे यांनी दिली आहे.

ठळक मुद्देवेगवान वाऱ्यामुळे सातत्याने तिरंगा फडकवणे अडचणीचेकेएसबीपीची माहिती, ध्वजनियमाचे होते पालन

कोल्हापूर : ताशी ३0 ते ३५ किलोमीटर वाहणाऱ्या वाऱ्यामुळे पोलीस उद्यानातील तिरंगा ध्वज सातत्याने फडकवता येत नाही. या वाऱ्यामुळे तो फाटण्याची शक्यता असल्याने ध्वजाचा सन्मान राखण्यासाठी हा निर्णय घ्यावा लागतो, अशी माहिती केएसबीपीचे अध्यक्ष सुजय पित्रे यांनी दिली आहे.पोलीस उद्यानामध्ये गतवर्षी महाराष्ट्र दिनी हा महाराष्ट्रातील सर्वांत उंच आणि देशातील दुसऱ्या क्रमांकाचा ध्वज उभारला गेला; मात्र हा तिरंगा सातत्याने फडकवत ठेवला जात नसल्याने नागरिकांतून याबाबत सातत्याने विचारणा होत होती.या पार्श्वभूमीवर सुजय पित्रे यांनी पत्रक प्रसिद्धीस दिले आहे. ३0३ फूट उंचीचा हा ध्वज उभारताना सर्व तांत्रिक बाबींची माहिती घेतली होती. कोल्हापूरच्या वातावरणाची सरासरी काढून ताशी २५ किलोमीटर वारे वाहण्याजोग्या परिस्थितीमध्ये ध्वज, त्याचा आकार, मटेरियल याचे नियोजन केले होते. मात्र सध्या ताशी ३0 ते ३५ किलोमीटर वेगाने वारे वाहत असल्याने ध्वज आणि स्तंभ याच्यात मोठा तणाव निर्माण होतो; त्यामुळे ध्वज फाटण्याचा संभव असतो.

गेल्या काही दिवसांमध्ये वाऱ्याचा वेग, ध्वज चढवताना आणि उतरवताना होणारा त्रास, ध्वजाचे होणारे नुकसान याचा विचार करून याबाबत तज्ज्ञांचा सल्ला घेण्यात आला असून, त्यांनीही सातत्याने ध्वज फडकवणे धोकादायक असल्याचे सांगितले आहे.एका ध्वजाची किंमत ८२ हजार रुपये असल्याने मोठ्या वाऱ्यात जर सतत ध्वज फाटत राहिला तर आर्थिकदृष्ट्याही ते परवडणारे नाही. केंद्र शासनाचे ध्वजासंदर्भातील नियम याचाही विचार केला गेला आहे. या सर्व बाबींचा अभ्यास करून वेगवान वाऱ्यावेळी ध्वज उतरवला जातो.

मुंबईतील राजभवन किंवा वाघा बॉर्डर येथील ध्वजही नियमित फडकवता येत नाहीत. त्यामुळे विशिष्ट प्रसंग, दिन हे लक्षात घेऊन योग्य वातावरण असताना ध्वज फडकवला जातो याची नागरिकांनी नोंद घ्यावी, असे सुजय पित्रे यांनी पत्रकामध्ये नमूद केले आहे. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूर