शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे रुग्णालयात दाखल, प्रकृती बिघडली
2
प्रियकराने सोनमला संपविले अन् अजगर असलेल्या विहिरीत फेकले; दोन वर्षांनी पोलिसांना...
3
RBI Policy पूर्वी शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात; सेन्सेक्स १०० अंकांनी वधारला, फार्मा शेअर्समध्ये तेजी
4
६३ कोटींचा दसरा मेळावा, भाजपाचा गंभीर दावा; उद्धव ठाकरेंवर जहरी टीका, ९ आकड्याचं गणित सांगितलं
5
अमेरिकेत 'शटडाऊन'चं संकट, सरकारी कामकाज बंद; ६० मतांची होती गरज, ट्रम्प यांना मिळाली ५५ मते
6
"असीम मुनीर म्हणाले, तुम्ही कोट्यवधी लोकांचे जीव वाचवले"; डोनाल्ड ट्रम्प आता काय बोलले?
7
LPG Price 1 October: एलपीजी सिलिंडर महागला, दसऱ्यापूर्वी मोठा झटका; दिल्ली ते मुंबईपर्यंत इतकी वाढली किंमत
8
"दुबईच्या शेखला सेक्स पार्टनर हवा," बाबा चैतन्यानंदाची विद्यार्थीनींकडे अश्लील मागणी; चॅटमध्ये नेमके काय?
9
"...तर तुमची चूक माफ करणार नाही"; प्रिया मराठेच्या निधनानंतर शंतनूची पहिली पोस्ट, वाचून डोळे पाणावतील
10
युएन महासभेत गाझाचा मुद्दा; ट्रम्प यांनी मुनीर आणि शरीफ यांच्या पाठिंब्याचा केला खुलासा!
11
फिलीपिन्समध्ये भूकंपाचा धक्का, २२ जणांचा मृत्यू; अनेक इमारती कोसळल्या
12
चिनी इन्फ्लूएन्सरनं केलं 'फॉलोअर'शी लग्न! व्हायरल होतेय त्यांची प्रेमकहाणी
13
सोनम वांगचुक यांच्या अडचणी वाढणार! प्रशासनाने सांगितले, त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी पुरेसे पुरावे
14
राशीभविष्य १ ऑक्टोबर २०२५: 'या' राशीतील लोकांना आज खूप मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता
15
दळवी, तटकरेंमध्ये शाब्दिक 'वॉर' सुरूच! पालकमंत्रिपदावरील वाद दिवसेंदिवस शिगेला
16
वांगचूक यांना सोडा; तरच लडाखबाबत केंद्राशी चर्चा करू! एलएबीच्या भूमिकेला केडीएचा ठाम पाठिंबा
17
दिवाळीपूर्वी उद्योजक, व्यापाऱ्यांवर अतिरिक्त वीजदराचा बोजा, ९.९० पैसे प्रतियुनिटने वाढ
18
गोदाकाठी १६ गावांना अजूनही पुराचा वेढा, मराठवाड्यात ९१० डीपी, ९ हजार खांब पाण्यात
19
४.५ लाख महिला अत्याचाराच्या बळी! देशात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले, महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी
20
गाझात युद्ध थांबविण्यासाठी ट्रम्प यांची २० कलमी योजना इस्रायलला मान्य!

कोल्हापूर : प्रशासनात राहून समाजहिताला प्राधान्य द्या  : विनय कोरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2018 16:20 IST

विविध स्पर्धा परीक्षांतील गुणवंतांनी समाजाला दिशा देण्याचे काम करावे. त्यांनी प्रशासनात काम करताना समाजहिताला प्राधान्य द्यावे, असे प्रतिपादन माजी मंत्री विनय कोरे यांनी येथे केले.

ठळक मुद्देप्रशासनात राहून समाजहिताला प्राधान्य द्या  : विनय कोरे ‘शाहूवाडी-पन्हाळा रत्न’ पुरस्काराने एस. डी. लाड सन्मानित

कोल्हापूर : विविध स्पर्धा परीक्षांतील गुणवंतांनी समाजाला दिशा देण्याचे काम करावे. त्यांनी प्रशासनात काम करताना समाजहिताला प्राधान्य द्यावे, असे प्रतिपादन माजी मंत्री विनय कोरे यांनी येथे केले.येथील राजर्षी शाहू स्मारक भवनमध्ये शाहूवाडी-पन्हाळावासीय सेवा संघातर्फे आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. चंद्रकुमार नलगे होते.

कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाचे अध्यक्ष एस. डी. पाटील यांना माजी मंत्री कोरे यांच्या हस्ते ‘शाहूवाडी-पन्हाळा रत्न’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. मानपत्र, कोल्हापुरी फेटा, शाहू चरित्रग्रंथ, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप होते.

माजी मंत्री कोरे म्हणाले, आठवीतून शाळा सोडणाऱ्या विद्यार्थ्यांचे शाहूवाडी तालुक्यात मोठे प्रमाण आहे. या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात ठेवण्यासाठी वाडीवस्त्यांवर शिक्षणाचा प्रसार होण्याची गरज आहे. त्या दृष्टीने शासनस्तरावर प्रयत्न व्हावेत. शाहूवाडी-पन्हाळावासीय सेवा संघाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यासाठी माझा पुढाकार राहील.

ज्येष्ठ साहित्यिक नलगे म्हणाले, गुणवत्तेबाबत शाहूवाडी तालुका वेगाने पुढे जात आहे. तालुक्यातील अनेक मुले शालेय परीक्षा, स्पर्धा परीक्षांमध्ये चमकत असून ते अभिमानास्पद आहे.या कार्यक्रमात ज्येष्ठ साहित्यिक प्रा. चंद्रकुमार नलगे, प्रा. सर्जेराव शेटके-पाटील, लक्ष्य करिअर अकॅडमीचे संस्थापक लक्ष्मीकांत हंडे यांच्यासह विविध स्पर्धा परीक्षा, दहावी, बारावी परीक्षेतील गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. दादा लाड, किरण लोहार, सुरेश बच्चे, व्ही. बी. पायमल, आदींनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी पन्हाळा पंचायत समितीचे सभापती पृथ्वीराज सरनोबत, शाहूवाडी पंचायत समितीचे सभापती अश्विनी पाटील, सेवा संघाचे आनंदराव लोखंडे, अशोक पाटील, सुस्मिता लाड, शिवाजी पाटील, अशोक तोरसे, रवींद्र मोरे, आर. बी. पाटील, आदी उपस्थित होते. सेवा संघाचे अध्यक्ष अनिल चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. सुधाकर डोणोलीकर यांनी मानपत्र वाचन केले. बाळाराम लाड यांनी सूत्रसंचालन केले. रवींद्र मदने यांनी आभार मानले.

कामाची पोचपावतीसत्काराला उत्तर देताना लाड म्हणाले, शिक्षणक्षेत्रात गेल्या ३५ वर्षांत केलेल्या कामाची पोहोचपावती शाहूवाडी-पन्हाळा सेवा संघाच्या या पुरस्काराद्वारे मिळाली आहे. याबद्दल मी संघाचा ऋणी आहे.

 

 

टॅग्स :Vinay Koreविनय कोरेkolhapurकोल्हापूर