शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : लसणाची फोडणी झाली स्वस्त, घाऊक बाजारात दहा रुपयांपर्यंत घसरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2018 14:54 IST

गेले वर्षभर सुरू असलेली लसणाची घसरण अधिकच होऊ लागली असून, घाऊक बाजारात १० रुपये किलोपर्यंत पांढराशुभ्र लसूण मिळत आहे.

ठळक मुद्देलसणाची फोडणी झाली स्वस्त, घाऊक बाजारात दहा रुपयांपर्यंत घसरणमातीमोल किमतीत टोमॅटो, इतर भाजीपाल्यातही घट

कोल्हापूर : गेले वर्षभर सुरू असलेली लसणाची घसरण अधिकच होऊ लागली असून, घाऊक बाजारात १० रुपये किलोपर्यंत पांढराशुभ्र लसूण मिळत आहे.

भाजीपाल्याच्या दरातही घसरण सुरू असून टोमॅटोचा दर तर अक्षरश: मातीमोल झाला आहे. घाऊक बाजारात एक रुपया किलोपर्यंत दर खाली आल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ड्रायफ्रुटच्या दरात मात्र थोडी वाढ झाली आहे.लसणाच्या दरात वर्षभरापासून घसरण सुरू आहे. शंभर रुपये किलोपासून लसणाचे दर घसरत ५० रुपयांपर्यंत आला होता; पण या आठवड्यात दरात एकदमच घसरण झाली आहे. आवक कमी असूनही, उठाव नसल्याने दरात घसरण झाल्याचे व्यापाऱ्यांचे मत आहे.

कोल्हापूर बाजार समितीत रोज २०० पिशव्या लसणाची आवक होत आहे; तरीही दर १० रुपयांपर्यंत दर खाली आला आहे. कांद्याच्या दरातही घसरण झाली आहे. घाऊक बाजारात कांद्याचा पाच रुपये प्रतिकिलो दर आहे. बटाट्याचा दर १९ रुपये प्रतिकिलो आहे.भाजीपाल्याचे दरही कमी झाले असून श्रावण सुरू असला तरी भाज्यांची आवक जास्त असल्याने दरावर परिणाम दिसतो. कोबी, वांगी, ढबू, घेवडा, ओला वाटाणा, भेंडीचे दर गेल्या आठवड्याच्या तुलनेत कमी झाले आहेत.

वरणा, दोडका, ओल्या मिरचीचा दर काहीसे स्थिर राहिले आहेत. फ्लॉवरचे दरही कमी झाले आहेत. बाजारात फ्लॉवरचा गड्डा पाच ते सात रुपये प्रतिनग आहे.

कोथिंबिरीची आवक वाढली असली तरी मागणी जास्त असल्याने दरात वाढ झाली आहे. घाऊक बाजारात पाच रुपये पेंढी असून कांदापात, मेथी, पोकळा, पालक या पालेभाज्यांच्या दरात फारसा चढउतार दिसत नाही.फळबाजारात मोसंबी, संत्री, चिक्कू, पेरूची आवक जेमतेम आहे. डाळींब व सीताफळांची आवक वाढली आहे. डाळिंबाची आवक जास्त असल्याने दरात कमालीची घसरण झाली आहे. लहान डाळिंबाचे तर १५ रुपयांना ढीग आहेत.

शेंगदाण्याच्या दरात वाढ झाली असून कडधान्यही थोडे वधारले आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ड्रायफ्रुटची आवक जास्त असून मागणीही वाढू लागली आहे. नारळाची आवक थोडी कमी झाल्याने दर वाढले आहेत.‘सिमला’ सफरचंदांची आवक वाढली!पावसाळ्यात परदेशातून सफरचंदांची आवक व्हायची. आता सिमला येथूनही आवक सुरू झाली असून, त्यात दर आठवड्याला वाढ होत आहे. बाजार समितीत रोज १२०० हून अधिक बॉक्सची आवक होत आहे. किरकोळ बाजारात ५० पासून ११० रुपयांपर्यंत प्रतिकिलोचा दर आहे.

 

 

टॅग्स :Marketबाजारkolhapurकोल्हापूर