शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

‘लोकमत’च्या चौघांना प्रेस क्लबच्या पुरस्काराचा बहुमान; शुक्रवारी होणार वितरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2023 12:52 IST

वरिष्ठ पत्रकार समीर देशपांडे, ज्येष्ठ छायाचित्रकार नसीर अत्तार, छायाचित्रकार आदित्य वेल्हाळ व ‘लोकमत’ ऑनलाइनच्या दूर्वा दळवी यांचा समावेश  

कोल्हापूर : येथील कोल्हापूर प्रेस क्लब या पत्रकारांच्या प्रातिनिधिक संस्थेच्या वतीने देण्यात येणाऱ्या पुरस्कारांमध्ये सर्वाधिक चार पुरस्कार ‘लोकमत’च्या पत्रकार छायाचित्रकारांनी पटकावले. वरिष्ठ पत्रकार समीर देशपांडे, ज्येष्ठ छायाचित्रकार नसीर अत्तार, छायाचित्रकार आदित्य वेल्हाळ व ‘लोकमत’ ऑनलाइनच्या दूर्वा दळवी यांचा त्यामध्ये समावेश आहे. या पुरस्कारांचे वितरण शुक्रवारी (दि. ६ जानेवारी) सायंकाळी ६ वाजता होणाऱ्या समारंभात होईल. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून शाहू छत्रपती महाराज उपस्थित राहणार आहेत. स्तंभलेखक सुधींद्र कुलकर्णी यांचे ‘सद्य:स्थिती आणि पत्रकारितेसमोरील आव्हाने’ या विषयावर यावेळी व्याख्यान होणार आहे. प्रत्येकी ५ हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह, असे पुरस्काराचे स्वरूप आहे.पुरस्कार विजेते देशपांडे हे गेली २४ वर्षे पत्रकारितेत आहे. त्यांच्या पत्रकारितेची सुरुवात आजरा येथून झाली. मुख्यत: समाजातील सकारात्मक मांडणी ते करत आले आहेत. कोरोना काळात त्यांनी स्वत: पॉझिटिव्ह असतानाही केलेले वार्तांकन महत्त्वाचे ठरले. ज्येष्ठ छायाचित्रकार अतार हे गेली ३३ वर्षे वृत्तपत्रात छायाचित्रकार आहेत. छायाचित्रणाचा वारसा त्यांच्याकडे वडिलांकडून आला. उत्तम छायाचित्रासाठी रस्त्यावर पळणारा फोटोग्राफर अशी त्यांची कोल्हापूरच्या वृत्तपत्रसृष्टीत ओळख आहे.वेगळी नजर असलेला छायाचित्रकार अशी आदित्य वेल्हाळ यांनी आपली ओळख सिद्ध केली आहे. गेली अठरा वर्षे त्यांच्या हातात कॅमेरा आहे. वडिलांकडून त्यांनाही या व्यवसायाचा वारसा लाभला. दूर्वा दळवी मूळच्या कोकणातील असून त्या गेल्या सात वर्षांपासून ऑनलाइन जर्नालिझममध्ये आहेत. त्यांनी अल्पावधीतच आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे.दरवर्षीप्रमाणे यंदा २०२० आणि २०२१ या दोन वर्षांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेले पत्रकार, छायाचित्रकार कॅमेरामन यांना हे पुरस्कार जाहीर झाले आहेत. अन्य पुरस्कार विजेत्यांत दयानंद लिपारे (लोकसत्ता) व एकनाथ नाईक (दैनिक पुढारी) यांना २०२१ सालचा पुरस्कार विभागून देण्यात आला. इलेक्ट्रॉनिक माध्यमातून शेखर पाटील (ई टीव्ही) यांना २०२१ सालचा पुरस्कार जाहीर झाला. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूर