शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : समीर देशपांडे, प्रताप नाईक, राहूल गायकवाड, प्रमोद सौंदडीकर, अमरदिप पाटील यांना प्रेस क्लबचा पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 18:40 IST

पत्रकार दिनानिमित्त कोल्हापूर प्रेस क्लबतर्फे समीर देशपांडे, राहुल गायकवाड, प्रताप नाईक, प्रमोद सौंदडीकर आणि अमरदिप पाटील यांना शनिवारी पुरस्कार जाहिर करण्यात आला. सामाजिक प्रबोधनात प्रसार माध्यमांची भूमिका महत्वाची आहे, असे प्रतिपादन यावेळी महापौर स्वाती यवलुजे यांनी यावेळी केले.

ठळक मुद्दे कोल्हापूर प्रेस क्लबमध्ये पत्रकार दिनमहापौर स्वाती यवलुजे यांच्या हस्ते दर्पणकार जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पणउल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना कोल्हापूर प्रेस क्लबतर्फे पुरस्कार जाहिर पुरस्कार वितरण १0 जानेवारी रोजी केशवराव भोसले नाट्यगृहात सायंकाळी ५ वाजता

कोल्हापूर : पत्रकार दिनानिमित्त कोल्हापूर प्रेस क्लबतर्फे समीर देशपांडे, राहुल गायकवाड, प्रताप नाईक, प्रमोद सौंदडीकर आणि अमरदिप पाटील यांना शनिवारी पुरस्कार जाहिर करण्यात आला. सामाजिक प्रबोधनात प्रसार माध्यमांची भूमिका महत्वाची आहे, असे प्रतिपादन यावेळी महापौर स्वाती यवलुजे यांनी यावेळी केले.कोल्हापूर प्रेस क्लबमध्ये पत्रकार दिनाच्या कार्यक्रमात महापौर स्वाती यवलुजे यांच्या हस्ते आद्य पत्रकार दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.यावेळी उपमहापौर सुनिल पाटील, प्रेस क्लबचे अध्यक्ष लुमाकांत नलवडे, माहिती उपसंचालक सतीश लळीत, प्रेस क्लबचे उपाध्यक्ष तानाजी पोवार, सचिव विकास पाटील, सह सचिव पांडुरंग दळवी, चेंबर आॅफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष आनंद माने, नगरसेवक ईश्वर परमार यांच्यासह विविध पदाधिकारी, वरिष्ठ पत्रकार, इलेक्ट्रॉनिक माध्यमांचे प्रतिनिधी यांची प्रमुख उपस्थिती होती.लोकशाहीमध्ये वृत्तपत्रांचे काम अत्यंत महत्वाचे असून लोकशाहीचा चौथास्तंभ म्हणून प्रसार माध्यमांची ओळख आहे. आज माध्यमांसमोर खऱ्या अर्थाने सोशल मिडियाचे आवाहन आहे. या सर्व स्थितीतही वृत्तपत्रांचे व एकूण प्रसार माध्यमांचे प्रबोधनाचे काम अत्यंत कौतुकास्पद असल्याचे सांगून महापौर स्वाती यवलुजे यांनी सामाजिक प्रबोधनाबद्दल माध्यमांच्या भुमिकेचे कौतुक केले. महापौर यवलुजे यांनी प्रेस क्लबच्या वाचनालयासाठी जागा उपलब्ध करुन दिल्याचे सांगून प्रेस क्लबच्या कायार्ला शुभेच्छा दिल्या.माहिती उपसंचालक सतीश लळीत यांनी समाजात स्थैर्य, शांतता व सौहार्द राखण्यामध्ये माध्यमांची भुमिका महत्वाची असल्याचे सांगून पत्रकारितेत उत्कृष्ठ कामगिरी करणाऱ्यांना प्रेस क्लबच्या मार्फत पुरस्कार देण्याचा उपक्रम अत्यंत चांगला असून तो असाच पुढे सुरु रहावा, अशी सदिच्छा व्यक्त केली.निर्भिड पत्रकारितेचा सन्मान करण्यासाठी मराठी पत्रकार दिनाचे औचित्य साधून कोल्हापूर प्रेस क्लबतर्फे उत्कृष्ठ पत्रकार व छायाचित्रकार यांचा गौरव करण्यात येतो. यावर्षी वृत्तपत्रे, इलेक्ट्रॉनिक मिडिया व जाहिरात निर्मिती या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना कोल्हापूर प्रेस क्लबतर्फे पुरस्कार जाहिर करण्यात आले.

पुरस्कार वितरण १0 जानेवारी रोजी केशवराव भोसले नाट्यगृहात सायंकाळी ५ वाजता सिक्किमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील, श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, महापौर स्वाती यवलुजे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात येणार असल्याचे प्रेस क्लबचे अध्यक्ष लुमाकांत नलवडे यांनी सांगितले.पुरस्कार निवडीकरीता परिक्षक म्हणून माहिती उपसंचालक सतीश लळीत, छायाचित्रकार संजय देसाई, डॉ. सुनिल पाटील, शिवाजी विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी अलोक जत्राटकर, महाराष्ट्र राज्य विद्युत महावितरण कंपनीचे जनसंपर्क अधिकारी विकास पुरी यांचा सत्कार करण्यात आला.कोल्हापूर प्रेस क्लबने जाहीर केलेले पुरस्कार असे :

उत्कृष्ट पत्रकार : समीर देशपांडे (लोकमत)

उत्कृष्ट छायाचित्रकार : राहुल गायकवाड (टाईम्स आॅफ इंडिया) 

इलेक्ट्रॉनिक माध्यमात उत्कृष्ट रिपोर्ट : प्रताप नाईक (झी २४ तास वाहिनी)

उत्कृष्ट कॅमेरामन : प्रमोद सौंदडीकर (न्यूज १८ लोकमत)

उत्कृष्ठ जाहिरात निर्मिती : अमरदिप पाटील ( अ‍ॅडफाईन) 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरreporterवार्ताहर